उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 मुद्दे

शिवसेनेचा दसरा मेळावा (Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava) आज शिवाजी पार्कात पार पडला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava) यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 मुद्दे

मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा (Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava) आज शिवाजी पार्कात पार पडला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shiv Sena Dasara Melava) यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यावरुन विरोधकांना लक्ष्य केलं. बाळासाहेब ठाकरेंचे मुद्दे जगाने स्वीकारले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भूमिपुत्रांना नोकऱ्याचा मुद्दा उचलला, तो सर्वात आधी बाळासाहेबांनीच मुद्दा उचलला होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील 15 मुद्दे

तुम्ही माझं शस्त्र तुमचं पूजन करून महाराष्ट्रावर भगवा फडकवायला निघालोय : उद्धव ठाकरे

राम मंदिर कोर्टाने चांगला न्याय दिला तर आनंद आहे, नाहीतर विषय कायदा करा आणि राम मंदिर बांधा : उद्धव ठाकरे

राम मंदिरासाठी आम्ही वचनबद्ध : उद्धव ठाकरे

आम्ही वचने पाळणार नसू, तर वचन द्यायची ती पाळायची नाही तर ते रामालाही पटणार नाही : उद्धव ठाकरे

आता धनगराच्या काठीला तलवारीची धार लागली पाहिजे. आता सावध व्हा : उद्धव  ठाकरे

सत्ता मला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे : उद्धव ठाकरे

देशावर प्रेम करणारे मुसलमान सोबत आले तर त्यांनाही न्याय हक्क मिळवून देऊ : उद्धव ठाकरे

शरद पवार की चंद्राबाबू, मुलायम, की मायावती हे पंतप्रधान तुम्हाला चालले असते? : उद्धव ठाकरे

मी माझी ताकद काँग्रेसमागे कधी उभी करणार नाही : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रातल्या जनतेने जी स्वीकारली ती युती सपा बसपाची उत्तर प्रदेश मध्ये जनतेने का स्वीकारली नाही, कारण ती सत्तेसाठी झाली होती : उद्धव ठाकरे

आम्ही युती हिंदुत्वासाठी केली : उद्धव ठाकरे

चंद्रकांत पाटील बोलले होते आमची अडचण समजून घ्या, अही तुमची अडचण समजून घेतली. तुम्ही आता महाराष्ट्राची अडचण सोडवा, आम्ही आहोत तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे

जो पर्यंत काँग्रेसचे टार्गेट आम्ही आहोत, तोपर्यंत तेही आमचे टार्गेट राहणार : उद्धव ठाकरे

आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने राहा, काँग्रेस NCP वाल्यांनो : उद्धव ठाकरे

मगरीचे अश्रू ऐकले होते, अजित पवारांच्या डोळ्यात पाहिले – उद्धव ठाकरे

अजित पवार तुमच्या कर्माने पाणी डोळ्यात आलं आहे, आजपर्यंत मगरीच्या डोळ्यात असे पाणी पाहिलं होतं. अजित पवारांच्या डोळ्यात आज पाणी येतंय, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात जेव्हा पाणी येत होतं, तेव्हा तुम्ही कुठलं पाणी दाखवलं होतं?: उद्धव ठाकरे

आज ED चे राजकारण पवार तुम्हाला सुडाचे वाटते, मग 2000 साली महाराष्ट्राला का छळलं ? : उद्धव ठाकरे

आता तुमच्या धनगराच्या काठीला तलवारीची धार लागली पाहिजे, ती काठी नाही ती तलवार असली पाहिजे : उद्धव ठाकरे

“प्राण जाए पर वचन ना जाए ही शिवसेनेची निती आहे, ही शिवसेनेची वृत्ती आहे.” -उद्धव  ठाकरे

हे शिवसैनिक जे आहेत, ही माझी तलवार आहे. गोरगरिबांचं अन्यायापासून रक्षण करणारी ढाल आहे आणि प्रेमाने आलिंगन दिल्यानंतर पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणारी ही माझी वाघनखं आहेत.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI