उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून धडाडणार, आजपासून दौरे; विदर्भातील ‘या’ नेत्याच्या मतदारसंघातून वारप्रतिवार

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालपासून राज्यात सभांचा धडाका लावला आहे. शरद पवार यांनी काल नाशिकच्या येवला येथे सभा घेतली.

उद्धव ठाकरे यांची तोफ आजपासून धडाडणार, आजपासून दौरे; विदर्भातील 'या' नेत्याच्या मतदारसंघातून वारप्रतिवार
Uddhav ThackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 7:15 AM

मुंबई : ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेत पडलेली फूट आणि राष्ट्रवादीत झालेली बंडाळी या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे मैदानात उतरणार आहेत. विदर्भातील यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसीय झंझावाती दौरा सुरू होणार आहे. यावेळी ते जनतेशी संवाद साधणार असून आपली भूमिका मांडणार आहे. यावेळी राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि शिंदे गटावर काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कालपासून राज्यात सभांचा धडाका लावला आहे. शरद पवार यांनी काल नाशिकच्या येवला येथे सभा घेतली. छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातच पवार यांनी पहिली सभा घेऊन भुजबळांना आव्हान दिलं. शरद पवार यांच्या सभांचा धडाका सुरू झालेला असतानाच आता उद्धव ठाकरेही सभांचा धडाका लावणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यात ते जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या जिल्ह्यात जाणार

उद्धव ठाकरे पहिल्या टप्प्यात विदर्भातील यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने काही सूचनाही देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पहिला दौरा यवतमाळमध्ये

मंत्री संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळमधून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू होणार आहे. दुपारी 2 वाजता ते दारव्हा दिग्रस येथे दाखल होणार आहे. यावेळी ते संजय राठोड यांचा खरपूस समाचार घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

असा असेल आजचा दौरा

दुपारी 2 वा. पोहरादेवी दर्शन

दुपारी 3 वा. यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

दुपारी 3.30 वा. वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सायंकाळी 4 वा. यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

उद्याचा दौरा

सकाळी 11 वा. अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

सकाळी 11.30 वा. अकोला जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा

दुपारी 1 वा. अमरावती व अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

सायंकाळी 6 वा. नागपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद

स्थळ : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर

Non Stop LIVE Update
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल
आणि नरेंद्र मोदी मंचावर येऊन रडतात, प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल.
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अजित दादांवरच्या 'त्या' आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण.
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?
कौल कुणाला? दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, बीड-शिरूर कोण राखणार?.
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू
पवारांच्या वक्तव्यावर शशी थरूर म्हणाले,तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू.
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?
मोदींच्या गुलामांच्या फौजेत आणखी एक भर, राज ठाकरेंवर कुणाचा निशाणा?.
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'
'राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर....'.
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात
फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं, ठाकरे गटातील बड्या नेत्याचा घणाघात.
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?
पवारांनी माझा राजीनामा मागितला...खडसे भाजपात येण्यापूर्वी काय म्हणाले?.
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल
ठाकरेंना 1999 पासूनच मुख्यमंत्रिपदाची स्वप्न, पण...फडणवीसांचा हल्लाबोल.
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर
११ महिन्यांच्या चिमुकल्यासह महिला कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर.