AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena : शिवाजी पार्कवरील शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार?; दसऱ्या मेळाव्यात खोडा येण्याचं नेमकं कारण काय?

Shiv Sena : शिवाजी पार्क मैदान मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन भाषण करणार का? याबाबत उत्सुकता लागली गेली आहे.

Shiv Sena : शिवाजी पार्कवरील शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार?; दसऱ्या मेळाव्यात खोडा येण्याचं नेमकं कारण काय?
शिवाजी पार्कवरील शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार?; दसऱ्या मेळाव्यात खोडा येण्याचं नेमकं कारण काय?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 27, 2022 | 9:16 AM
Share

मुंबई: दहीहंडी उत्सावाच्या वेळी वरळीचं जांबोरी मैदान पटकावून भाजपने शिवसेनेवर (Shiv Sena) कुरघोडी केली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता दसरा मेळाव्याच्यावेळी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कात होतो. यंदा शिवसेनेची ही परंपरा खंडित होण्याची चिन्हे दिसत आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान (shivaji park) मिळावं म्हणून शिंदे गटही सक्रिय झाला आहे. दादरला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचं शिंदे गटाला ठसवायचं आहे. शिवाय महापालिका निवडणुका असल्याने दसरा मेळाव्यातूनच (dussehra rally) शिंदे गट निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची चिन्हे आहेत. तर, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही दसरा मेळाव्यातून निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. मात्र, शिंदे गटही शिवाजी पार्क मैदानासाठी सक्रिय झाल्याने हे मैदान कुणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

येत्या 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात दसरा मेळावा कुणी घ्यायचा यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून महापालिकेकडे अर्ज दाखल केला असताना महापालिकेकडून परवानगीसाठी हात आखडता घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे महापालिका उद्धव ठाकरे गटाला की एकनाथ शिंदे गटाला परवानगी देणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

उद्धव ठाकरे पालिका प्रशासकाशी स्वत: बोलले

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावं म्हणून स्वत: उद्धव ठाकरे यांना लक्ष घालावं लागल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांच्याशी संवाद साधून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याची विनंती केली आहे. मात्र, सिंह यांनी परवानगीसाठी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. एकनाथ शिंदे गटाला परवानगी मिळावी यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.

फडणवीस मार्गदर्शन करणार?

शिंदे गटाकडून यंदा पहिल्यांदाच भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे. शिवाजी पार्क मैदानावरच हा मेळावा पार पडणार आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मार्गदर्शन भाषण करणार का? याबाबत उत्सुकता लागली गेली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.