विलास तरे यांच्या उमेदवारीविरोधात शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंना पत्र

आयात आमदार विलास तरे यांना उमेदवारी देऊ नये (Shiv sainik oppose vilas tare candidature in boisar) म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली आहेत.

विलास तरे यांच्या उमेदवारीविरोधात शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंना पत्र

पालघर : आयात आमदार विलास तरे यांना उमेदवारी देऊ नये (Shiv sainik oppose vilas tare candidature in boisar) म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली आहेत. नुकतेच काही दिवासांपूर्वी आमदार विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र स्थानिक शिवसैनिकांकडून तरेंच्या उमेदवारीला सध्या जोरदार विरोध (Shiv sainik oppose vilas tare candidature in boisar) होत आहे.

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांना शिवसेनेने बोईसर विधानसभेसाठी आयात उमेदवार केल्याने शिवसेनेत मोठा कलह आहे. विलास तरे यांच्या उमेदवारीला बोईसर विधानसभेतील निष्ठावान शिवसैनिकांचा विरोध होत आहे. स्थानिक उमेदवाराला विधानसभेची उमेदवारी मिळावी. आयात उमेदवार नको अशी मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.

बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी शिट्टी सोडून धनुष्यबाण हातात घेतला. पण त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून बोईसर विधानसभेतील 90 पैकी तब्बल 54 शाखांनी थेट उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिली आहेत. त्यामुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे निष्ठावान शिवसैनिक यांची दखल घेऊन विलास तरे यांचा पत्ता कट करतील का? हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.

विलास तरे हे गेले दोन टर्म बोईसर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. बहुजन विकास आघाडीतून त्यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. 2009 ला ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. मात्र आता बहुजन विकास आघाडी सोडत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा
निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *