AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वंचित’ला घटस्फोटानंतर नवा जोडीदार! ‘आप’सोबत आघाडीचे संकेत

आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकांसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे

'वंचित'ला घटस्फोटानंतर नवा जोडीदार! 'आप'सोबत आघाडीचे संकेत
| Updated on: Sep 10, 2019 | 1:24 PM
Share

मुंबई : ‘एमआयएम’सोबतच्या (AIMIM) आघाडीत बिघाडी झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi Alliance) नवीन जोडीदाराच्या शोधात आहे. त्यातच ‘आम आदमी पक्षा’च्या (Aam Aadmi Party) रुपाने वंचितला किंचित दिलासा (Vanchit Bahujan Aghadi Alliance) मिळण्याची शक्यता आहे. चर्चा यशस्वी ठरल्यास ‘आप’ वंचितच्या गोटात सहभागी होऊ शकते.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि काही प्रमुख पदाधिकारी यांची ‘आम आदमी पक्षा’च्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक झाली. दादरमधील आंबेडकर भवनात झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे ‘आप’चे नेते अरविंद केजरीवालही या युतीस अनुकूल आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ‘आप’ वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

काँग्रेससाठी दरवाजे बंद

प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेससोबत युती करणार नसल्याचं कालच स्पष्ट केलं होतं. काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही कोणताही फरक झालेला नाही. काँग्रेस अजूनही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच वागत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांशीही आम्ही बोललो. त्यातून काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा राहिलेली नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं होतं.

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा घटस्फोट

आता आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आम्ही आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करु. यापुढे वेळ फार कमी आहे. त्यामुळे निवडणूक वेळापत्रक लक्षात घेता आम्हाला प्रचारासाठीही वेळ हवा आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

एमआयएमसोबत युतीसाठी बोलणी सुरु आहे. या युतीसाठी फॉर्म भरण्याच्या दिवसापर्यंत वाट पाहणार आहे. ओवेसी यांच्यासोबत पुण्यात भेट झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या युतीबाबत मी आशावादी आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. त्यामुळे ‘वंचित-एमआयएम आणि आप’ असा ट्रँगल पाहायला मिळणार का, याची उत्सुकता आहे.

वंचितसोबत घटस्फोट घेणाऱ्या एमआयएमचं स्वागत : रामदास आठवले

असदुद्दीन ओवेसी यांना युतीबाबत मेल करण्यात आला होता. तो मेल मिळाल्यानंतर त्यांनी युतीबाबत काय भूमिका घ्याची याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर आम्ही तातडीने प्रसिद्धीपत्रक काढून आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. ही भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका आहे. कुणाला मान्य करायची असेल तर करावी नसेल करायची तर करू नये, असं इम्तियाज जलील म्हणाले होते.

गेल्या निवडणुकीत एमआयएमला वंचितमुळे काहीही फायदा झाला नाही, उलट वंचितलाच एमआयएममुळे फायदा झाला होता, असं म्हणत रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं.

संबंधित बातम्या 

आमची युती ओवेसींसोबत, एमआयएमच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी नाही

वंचितमध्ये संघाचे लोक घुसलेत का? इम्तियाज जलील यांचा सवाल

काँग्रेसला दरवाजे बंद; ओवेसींची शेवटपर्यंत वाट पाहणार : प्रकाश आंबेडकर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.