वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर

वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते, विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि "उपरा'कार लक्ष्मण माने आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

Laxman Mane going to join NCP, वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण माने पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते, विमुक्त जमाती संघटनेचे अध्यक्ष आणि “उपरा’कार लक्ष्मण माने आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत (Laxman Mane going to join NCP ). ते 12 एप्रिलला बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये औपचारिक प्रवेश करणार आहेत. लक्ष्मण माने यांनी स्वतः पुण्यात त्यांची भूमिका स्पष्ट केली.

लक्ष्मण माने म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत मला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शरद पवार हे माझ्या समाजासाठी मोठा आधार वाटतो. त्यामुळे एनआरसी आणि सीएएच्या विरोधात लढण्यासाठी मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”

केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या निर्णयांमुळे आमचं नागरिकत्वच धोक्‍यात येणार आहे. त्यामुळे समाजात जागृती करण्यासाठी वाड्या वस्त्यांवर भटक्‍या विमुक्त, वंचितांच्या नागरिकत्वाची शोधयात्रा काढली जाईल. याची सुरुवात 12 मार्चला कराडपासून होणार आहे. यात्रेचा शेवट 12 एप्रिल रोजी बारामतीत होईल. त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं माने यांनी सांगितले.

दरम्यान, लक्ष्मण माने यांनी काही काळापूर्वीच वंचित बहुजन आघाडीत बंडखोरी करत प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, त्यांनी स्वतःच वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून ‘महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी, या नवीन पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते. विधानसभेच्या तोंडावर मानेंनी नव्या पक्षाची स्थापना करून भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना चांगलं अडचणीत आणलं.

संबंधित बातम्या :

वंचितचे बंडखोर नेते लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा

वंचितमधून बाहेर पडून प्रकाश आंबेडकरांना आव्हान, लक्ष्मण मानेंकडून नव्या पक्षाची घोषणा

… तर मी शिवसेनेला मदत करेन : लक्ष्मण माने

लक्ष्मण मानेंच्या टीकेनंतर वंचितचं काम बंद, गोपीचंद पडळकरांचा राजीनामा

आधी लक्ष्मण माने, मग MIM, आता सख्खा भाऊ ‘वंचित’मधून बाहेर, प्रकाश आंबेडकरांना धक्का

संबंधित व्हिडीओ:


Laxman Mane going to join NCP

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *