VIDEO: कार्यकर्त्याची हारात 'घुसखोरी', शरद पवारांचा कोपरानं 'सर्जिकल स्ट्राईक'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar in Akola) हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्याविषयी राजकीय वर्तुळात अनेक दंतकथाही आहेत.

VIDEO: कार्यकर्त्याची हारात 'घुसखोरी', शरद पवारांचा कोपरानं 'सर्जिकल स्ट्राईक'

अकोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar in Akola) हे राजकारणातील मुरब्बी व्यक्तीमत्त्व आहे. त्यांच्याविषयी राजकीय वर्तुळात अनेक दंतकथाही आहेत. शरद पवार यांना महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील किमान एक कार्यकर्ता तरी चेहरा आणि नावानिशी माहिती आहे, असंही सांगितलं जात. पवार आपल्या कार्यकर्त्यांशी स्नेहपूर्ण संबंध तयार करण्यात आणि ते दीर्घकाळ टिकवण्यात निष्णात असल्याचंही बोललं जातं. मात्र, अकोला येथे बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम गावंडे यांच्या प्रचार कार्यक्रमात काहीसं वेगळंच (Sharad Pawar pushing Activist) पाहायला मिळालं. त्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

अकोल्यातील जाहीर प्रचार सभेत कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना गुलाबांचा एक मोठा हार घातला. तो हार घालताना एक कार्यकर्ता शरद पवार यांच्यासोबत फोटोत दिसण्यासाठी त्या हारात डोकं घालत होता. मात्र, कार्यकर्त्यांना समजून घेत कलाकलाने काम करणाऱ्या पवारांनी या कार्यकर्त्याचा चांगलाच हिरमोड केला.


राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांना हार घालत असताना एक कार्यकर्ता अचानक पवारांच्या उजव्या हाताखालून त्या गुलाबाच्या हारात डोकं घालत होता. मात्र, पवारांनी त्याला तात्काळ आपल्या हाताच्या कोपरानं बाजूला केलं. यानंतर या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील कार्यकर्ता कोण हे समजू शकलेलं नाही. मात्र, पवारांच्या या प्रतिक्रियेने शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत कसे वागतात असा प्रश्न उपस्थित करत अनेकांनी टीकाही केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *