Video : भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर!

अक्षता तेंडुलकर यांनी काही शिवसैनिकांनी मागून येत आपल्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आता त्यांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

Video : भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकरांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर!
अक्षता तेंडुलकर यांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल


मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आज शिवसेना भवनासमोरच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. भाजपचं फटकार आंदोलन संपल्यानंतर परत जाताना काही शिवसैनिकांनी भाजपचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केल्यात. याबाबत माहिम पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय. त्यानंतर आता भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांचा एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये त्या चप्पल दाखवताना दिसून येत आहेत. (BJP woman workers Akshata Tendulkar showing slippers goes viral)

शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर संध्याकाळी अक्षता तेंडुलकर यांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ शिवसेना भवनासमोरील आहे. अक्षता तेंडुलकर यांनी काही शिवसैनिकांनी मागून येत आपल्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, आता त्यांचा चप्पल दाखवतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे आता शिवसेनाही अक्षता तेंडुलकर यांच्या आणि पर्यायानं भाजपच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यात आहे.

अक्षता तेंडुलकरांचा आरोप काय?

शिवसैनिकांनी भाजप युवा मोर्चाचे विलास आंबेकर, सनी साठे, ऋषी शेळमकर यांच्यावर हल्ला केला. त्यांना मारहाणही करण्यात आली. मात्र त्याचवेळी भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. शिवसैनिकांनी आपल्यावर-एका महिलेवर हात उचलला, ही शिवसेना नव्हे, ही तर खिल्जीसेना आहे, यांचं कसलं हिंदुत्व असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर यांनी केला.

गुंडा सेना, हप्तावसुलीवाले आले आहेत हे, आमचे युवा मोर्चेवाले आले, गाडीने जात होतो आम्ही, हे सेनावाले आले आणि आम्हाला मारायला लागले, यांच्या बापाचं आहे का दादर? शिवसेना नव्हे खिल्जीसेना आहे ही, एका बाईवर हात उचलला, यांना हिंदुत्वाचं काही पडलं नाही, असा हल्लाबोल अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.

कोण आहेत अक्षता तेंडुलकर?

अक्षता तेंडुलकर या भाजपच्या माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षा आहेत

अक्षया तेंडुलकर यांची गेल्या वर्षी माहिम विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

कोरोनाच्या काळात त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्य केले

भाजप माहिम महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली

त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांची माहिम विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली

संबंधित बातम्या :

VIDEO: शिवसेना भवनासमोरील आंदोलनात राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप!

भाजप महिला कार्यकर्त्यांना मारहाणीचा आरोप, माजी महापौर श्रद्धा जाधवांसह 7 शिवसैनिकांवर गुन्हा, अटकेसाठी भाजपचा ठिय्या

BJP woman workers Akshata Tendulkar showing slippers goes viral