महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज, मात्र आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय : विजय वडेट्टीवार

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार ओबीसींना अधिक निधी मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत (Vijay Wadettiwar on meeting of OBC leader and fund demand).

महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज, मात्र आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय : विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 5:10 PM

मुंबई : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार ओबीसींना अधिक निधी मिळावा यासाठी आक्रमक झाले आहेत (Vijay Wadettiwar on meeting of OBC leader and fund demand). महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी समाज आहे, मात्र तो आजही अत्यंत गरीब असून अडगळीत पडलाय, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीला अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि संजय राठोड असे अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात 52 टक्के ओबीसी आहेत. हा समाज अत्यंत गरीब असून अडगळीत पडला आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना स्वतंत्र वसतिगृह नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळा नाहीत, इतर सवलती नाही, स्कॉलरशिपलाही पैसे मिळत नाही. ओबीसी समाजासाठी निधी मिळाला पाहिजे. त्यासाठी आज ओबीसी नेते आणि आमदार यांची बैठक आहे. महामंडळं, त्याचे भाग भांडवल अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा होईल.”

“साडेसहा वाजता आम्ही सर्व भेटणार आहोत. या बैठकीत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि संजय राठोड हे सहभागी होणार आहेत. ओबीसींना लोकसंख्येनुसार निधी मिळाला पाहिजे. पदोन्नतीमधील आरक्षण भरलं पाहिजे. ओबीसी आरक्षण कमी झालं आहे. ओबीसी आरक्षण कायम राहिलं पाहिजे,” असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात 3 पक्षांचं सरकार आहे. केंद्रामध्ये निर्णय घेण्यात आला असला तरी राज्यात एकत्र बसून चर्चा होते. या कायद्याबाबत आमचे नेते निर्णय घेतील. हे बिल शेतकरी विरोधी आहे. त्याची अंमलबजावणी होऊ नये. राज्य सरकारने तिच भूमिका घेतली पाहिजे.”

भाजपसह विरोधी पक्षांकडून राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची चर्चा सुरु असल्याच्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी भाजपला जोरदार टोला लगावला. कुणाला झोपेत स्वप्न पडतात, कोणाला जागेपणी पडतात. हा ज्याचा त्याचा भाग आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून विदर्भातील पूरग्रस्त प्रत्येक‌ जिल्ह्याला मदत‌ केली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली.

विदर्भातल्या पूरग्रस्तांना 162 कोटी रुपयांची मदत

नागपूर – 45 कोटी

वर्धा – 69 लाख

भंडारा – 42 कोटी

गोंदिया – 12.5 कोटी

चंद्रपूर – 38 कोटी‌

गडचिरोली – 24.50 कोटी

हेही वाचा :

वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप

आता ओबीसींनाही हवाय ज्यादा निधी, वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ओबीसी नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

Chandrapur Flood | पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजारांची तातडीची मदत, थेट खात्यात पैसे जमा होणार – विजय वडेट्टीवार

व्हिडीओ पाहा :

Vijay Wadettiwar on meeting of OBC leader and fund demand

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.