वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप

आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले. (Vinayak Mete Comment on Maratha Reservation Issue) 

वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 8:43 AM

सातारा : मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी आणि मराठ्यांची एकी वाढवण्यासाठी येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीचे निमंत्रण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला. (Vinayak Mete Comment on Maratha Reservation Issue)

मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेण्याचं काम हे सरकार करत नाही. मराठा समाजामध्येही एकी दिसून येत नाही. त्यामुळे येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात संपूर्ण राज्यातील मराठा समाजातील प्रमुख मंडळी एकत्र आणण्याचे काम केलं जाणार आहे. यावेळी ‘मराठा विचार मंथन’ बैठकीच्या माध्यमातून पुढील काळात मराठा आरक्षणाबाबत नेमकी दिशा काय असणार हे यात ठरवले जाणार आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिली.

“ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत. वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला. ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले.”

गृह आणि आरोग्य खाती राष्ट्रवादीकडे, तेच भरती काढतात

“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर गृहखात्यापाठोपाठ आरोग्य खात्यानेही भरती काढली आहे. ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तेच भरती काढत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मात्र आरक्षणावर मार्ग काढायचा आहे असे म्हणतात, पण त्यावर मार्ग काढत नाहीत. याबाबत त्यांना मी अनेकदा बोललो आहे. ते राज्यातील छोटे-छोटे प्रश्न सोडवतात मग हा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत,” असा सवाल मेटेंनी उपस्थित केला.

“हे राज्य हा देश..हिंदवी स्वराज्य..हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. अशा थोर व्यक्तींचे वंशज त्यांच्या गादीला आदर आहे. अशा व्यक्तींनी समाजाला दिशा द्यावी यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले हे यातून योग्य मार्ग काढतील यासाठी “मराठा विचार मंथन” बैठकीच्या निमंत्रणासाठी साताऱ्यात आलो असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.”

मुख्यमंत्र्यांना कोणी चांगला सल्ला देत नाही

“महाआघाडी सरकारमध्ये मराठा समाजाचे नेते आहेत. ते आरक्षणाबाबत पुढाकार घेत नाहीत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत आणि त्यांना कोणी चांगला सल्ला देत नाही,” असा मिश्किल टोला विनायक मेटेंनी लगावला. (Vinayak Mete Comment on Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

Dhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करु : गोपीचंद पडळकर

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.