AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झेंडा वंदनाला आलेल्या पालकमंत्री अनिल परबांना 14 दिवस क्वारंटाईन करा : विनय नातू

पालकमंत्री अनिल परब यांना 14 दिवसांसाठी रत्नागिरीत क्वारंटाईन करा, अशी मागणी भाजप नेते विनय नातू यांनी केली (Vinay Natu demand to quarantine Anil Parab).

झेंडा वंदनाला आलेल्या पालकमंत्री अनिल परबांना 14 दिवस क्वारंटाईन करा : विनय नातू
| Updated on: Aug 15, 2020 | 2:55 PM
Share

रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना 14 दिवसांसाठी रत्नागिरीत क्वारंटाईन करावे, अशी मागणी माजी आमदार आणि भाजपचे नेते विनय नातू यांनी केली (Vinay Natu demand to quarantine Anil Parab). त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे यांच्याकडे मागणी केली. रत्नागिरीच्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे अपेक्षित आहेत. मात्र, सध्या मंत्री मुंबईत जाऊन बसत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनिल परब यांना क्वारंटाईन करुन घ्यावे, अशी भूमिका विनय नातू यांनी मांडली.

विनय नातू म्हणाले, “कोव्हिड-19 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारणेसाठी अनेक मोठे निर्णय करणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची शतकपूर्ती आज ना उद्या होणार आहे. जिल्हा रुग्णालयात काम करणारे नामवंत आणि अनुभवी डॉक्टर डॉ. मोरे यांचा कोरोनामुळेच मृत्यू झालेला आहे. यावरुन रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाचे गांभीर्य लक्षात येते.”

“जिल्ह्यामध्ये एसटीबाबत अनेक विषय आणि त्यांचे निर्णय होणे गरजेचे आहे. गौरी-गणपती सणाकरता गणेशभक्त वेगवेगळ्या मार्गाने गावांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना याबाबतही निर्णय होणे गरजेचे आहे. असे असताना जिल्ह्यातील मंत्री क्वारंटाईन होण्यासाठी मुंबईत जाऊन राहतात आणि आता पालकमंत्री देखील परत मुंबईला गेले, तर अनेक प्रश्न प्रलंबित राहतील. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबई महानगरपालिकेने बिहारचे पोलीस अधिकारी तिवारी यांना मुंबईतच क्वारंटाईन केले. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्यातच क्वारंटाईन करुन ठेवावे,” असं विनय नातू यांनी सांगितलं.

पालकमंत्री अनिल परब यांना क्वारंटाईन केल्याने जिल्ह्यातील पालकमंत्र्यांना समस्यांची जाण होईल. ते त्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाकडून करुन घेतील. त्याद्वारे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढणारा संसर्ग कमी होऊन जिल्ह्याचे आरोग्य सुधारेल. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, असं डॉक्टर विनय नातू यांनी सांगितले. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे लेखी मागणी केली आहे.

हेही वाचा :

पवार कुटुंब आदर्श, शरद पवार, अजित पवार आणि पार्थ एकत्रित बसून एका मिनिटात प्रश्न सोडवतील : राजेश टोपे

आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये, राज्यपालांचा अजितदादांना मिश्कील टोला

ज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Vinay Natu demand to quarantine Anil Parab

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.