ज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला (Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis).

ज्यांनी 5 वर्षे गृहखातं सांभाळलं त्यांचाच पोलिसांवर विश्वास नाही, हसन मुश्रीफांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

अहमदनगर : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला (Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis). ज्यांनी 5 वर्षे राज्याचं गृहखातं सांभाळलं त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं. यावेळी हसन मुश्रीफ यांनी भाजप अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही केला. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.”

हेही वाचा : फडणवीसांनी तिकडेच राहावे, आमच्या शुभेच्छा, बिहारच्या प्रभारीपदावरुन वडेट्टीवारांचा टोला

यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असल्याचं नमूद केलं. तसेच प्रशासनाला रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

“आपल्यासमोर सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे आव्हान आहे. हा प्रादुर्भाव रोखणं, मृत्यूदर कमी करणं, जी अंत्यवस्थ रुग्ण आहेत त्यांना ताबडतोब बेड मिळतील अशी व्यवस्था करणं, जास्तीत जास्त रुग्णांना लवकर बरं करणं हेच आज आपल्यासमोरचं आव्हान आहे. यासाठी काम सुरु आहे,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा :

अलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम, शेट्टींची टीका

अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

ग्रामपंचायत प्रशासक नेमणुकीवर कोर्टाने दणका दिल्याचे वृत्त खोटे, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

Hasan Mushrif criticize Devendra Fadnavis

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *