अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे (Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need).

अहमदनगरमध्ये लॉकडाऊनची गरज नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगरला लॉकडाऊनची कोणतीही गरज नाही. प्रशासनाने सर्व खबरदारी घेतल्याचं मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे (Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need). नागरिकांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे तूर्तास तरी अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हसन मुश्रीफ यांनी आज (25 जुलै) जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही आढावा बैठक झाली.

ग्रामपंचायत मुदत संपल्यावर पालकमंत्र्यांच्या शिफारशीने ग्रामपंचायतवर प्रशासक नेमावा असं परिपत्रक ग्रामविकास विभागाने काढलं आहे. यावर उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश काढत प्रशासक हा शासकीय अधिकारी नेमावा असं म्हटलं. शिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पालकमंत्र्यांच्या शिफारशीला विरोध केला. मात्र, गावगाडा चालू राहण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती असल्याचं स्पष्टीकरण हसन मुश्रीफ यांनी दिलं. इतकेच नाही तर सध्या ग्रामपंचायत कारभार चालवणं हा छातीवरचा धोंडा असल्याचंही ते म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

‘बकरी ईद में बचेंगे तो मोहरम में नाचेंगे’

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुस्लीम बांधवांनी बकरी ईद घरीच साजरा करावा, असं आवाहन केलं आहे. ‘बकरी ईद में बचेंगे, तो मोहरम में नाचेंगे’ असं म्हणत त्यांनी पुढील वर्षी उत्साहात ईद साजरा करण्याचा आशावाद व्यक्त केला.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 858 पर्यंत पोहचली आहे. आज 70 नव्या कोरोना रुग्णांची बर पडली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 1480 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 1327 रुग्ण कोरोना सक्रीय असून ते उपचार घेत आहेत. अहमदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुक्यातील 12, पारनेर तालुक्यातील 5, नेवासा तालुक्यातील 2, राहातामधील 11, राहुरी 7, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 3, नगर शहर 11, पाथर्डी 1, शेवगाव 1, भिंगार 10, कर्जत 2, अकोले तालुका 1, नांदेड 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा :

युद्ध असो वा नैसर्गिक आपत्ती निवडणुका घेतल्याच पाहिजे, न्यायालयाने आदेश काढावा : प्रकाश आंबेडकर

राज्यात आतापर्यंत 8232 पोलिसांना कोरोना, 93 पोलिसांचा मृत्यू

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

Hasan Mushrif on Ahmednagar lockdown need

Published On - 2:05 pm, Sat, 25 July 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI