माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील

आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं",असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil on Ram Mandir)

माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Aug 04, 2020 | 5:11 PM

मुंबई : “कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. (Jayant Patil on Ram Mandir)

धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे. कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीबाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील, असं जयंत पाटील म्हणाले. “राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही. पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत”, असं जयंत पाटील यांनी अधोरेखित केलं.

राऊतांच्या मुलाखतीचं भाजप कौतुक कसं करेल?

संजय राऊतांच्या मुलाखतीचे भाजप कौतुक कसं करणार? सरकार पडणार अशा चर्चा विरोधकांना सुरु ठेवाव्या लागतात. संख्या 105 असल्याने विरोधकांचा असा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री एकत्र भेटणं हा नित्याचा भाग आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न कशाला?

काँग्रेसवर अन्याय होत कामा नये. मुख्यमंत्री हे काँग्रेसशीदेखील चर्चा करत आहेत. काँग्रेसची नाराजी नाही. कालच आम्ही सगळे एकत्र होतो. अशोक चव्हाण नाराज नाहीत हे बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. छोट्या-मोठ्या गोष्टी झाल्या तर सरकारच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

(Jayant Patil on Ram Mandir)

संबंधित बातम्या  

शरद पवार राम मंदिराच्या भूमीपूजनावर ‘त्या’ अनुषंगाने बोलले, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या राम मंदिराच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणतात…   

Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.