AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या राम मंदिराच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणतात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या राम मंदिर भूमिपूजनाच्या विधानावर मत व्यक्त केलं आहे (Uddhav Thackeray on Sharad Pawar Ram Mandir).

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या राम मंदिराच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणतात...
| Updated on: Jul 25, 2020 | 10:32 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही उत्तर दिले (Uddhav Thackeray on Sharad Pawar Ram Mandir). शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिरावर केलेल्या विधानावरही विचारणा केली. ते म्हणाले, शरद पवार यांनी अयोध्येत राम मंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त असल्याचं म्हटलं. तसेच मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी डॉक्टर्स लागणार आहे, असं म्हटलं. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :

  • लॉकडाऊनला विरोध करणारे जनतेची जबाबदारी घेणार का?
  • मी फिरत नाही, त्यामुळं घरी अभ्यास होतो , अभ्यास न करता फिरण्याला काय अर्थ आहे
  • सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांत माझा समावेश झाल्याने विरोधकांना पोटदुखी
  • WHO ने धारावीचं उदाहरण सा-या जगाला दिले, वॉशिंग्टन पोस्टनंही मुंबईत लपवाछपवी नाही असं म्हंटलंय, विरोधक काय म्हणतायत त्याकडे लक्ष देत नाही
  • देवच म्हणतोय मी तुमच्यातच आहे, मंदिरात येऊ नका, गाडगेबाबाही चंद्रभागेतिरी झाडलोट करुन विठ्ठलदर्शन घ्यायचे
  • घाईघाईन लॉकडाऊन लावणे आणि उठवणे चूक , घिसाडघाईनं लॉकडाऊन उठवले न् साथ पसरली तर जीव जातील
  • “जीव गेला तरी बेहत्तर लॉकडाऊन उठवा” यास आहे का तयारी? मी म्हणजे ट्रम्प नाही, डोळ्यासमोर माझी माणसे तडफडू देणार नाही
  • लॉकडाऊन उठवले तर घरंच्या घरं रिकामी होऊन टाळे लागतील, अख्खे कुटुंबच मरण पावले तर घराचे टाळे कोण उघडणार?
  • अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत, राज्यपालांनीही मला कळवलंय, शाळा आत्ताच नाही, अन्यत्र शाळा सुरु होऊन मुलांना बाधा
  • शाळा कधी सुरु होणार पेक्षा शिक्षण कसे सुरु होणार असे विचारा, परीक्षा व्हावी असे मलाही वाटते, पण परिस्थिती तशी नाही
  • मी निर्णय घेताना टीकेची पर्वा करत नाही, बरोबर वाटेल ते करतोच
  • सध्या विरोधी पक्षनेतेपदाचे दिवस धुमधडाक्याने साजरे होता आहेत
  • नैसर्गिक आपत्ती येतात, जातात, कोरोनाचं तसं नाही, कोरोनाचं युद्ध हे खऱ्या अर्थाने विश्वयुद्ध आहे
  • लॉकडाऊन उठवलेल्या देशांनी पुन्हा लॉकडाऊन लावले
  • महाराष्ट्रात सैन्य बोलावण्याची वेळ कधीच आली नाही
  • महाराष्ट्रानेही चीनप्रमाणे 15-20 दिवसांत हॉस्पिटल्स उभारले

“विरोधक विमानाने न जाता बैलगाडीतून का जात नाही?”

उद्धव ठाकरे म्हणाले, “तंत्रज्ञान उपलब्ध असून उपयोग न करणं दुर्भाग्यपूर्ण आहे. मी घराबाहेर पडत नाही, असा आरोप करणारे विमानातून न जाता बैलगाडीतून का जात नाही. जर तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा नाही, तर मग शोध का लावतात?”

“आता तंत्रज्ञान प्रचंड विकसित आहे. कोरोनाच्या संसर्गाचाही धोका आहे. त्यामुळे मंत्रालयही बंद आहे. काम करण्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही. मी घरात बसूनही राज्य हाकता येतं. मी घरातून निर्णय घेत आहे. प्रत्यक्ष भेटीमध्ये फक्त एकाच ठिकाणी जाता येते, आता एकाचवेळी अनेक ठिकाणी जात आहे, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

“जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही”

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. जनता माझ्या सोबत असल्याने मला कोणताही ताण-तणाव नाही. जनतेचा माझ्यावर आशिर्वाद माझ्यावर आहे. त्यामुळे मला कुठलीही चिंता नाही. मी जनतेच्या आरोग्याची काळजी करत काम करत आहे. मी मुख्यमंत्री झालो आणि जागतिक आणीबाणीच आली. कोरोनाबरोबर जगायला सगळ्यांनीच शिकायला हवे.”

हेही वाचा :

Uddhav Thackeray | परीक्षा नाहीच, शाळा आताच नाही : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray | भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता : उद्धव ठाकरे

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला

Uddhav Thackeray on Sharad Pawar Ram Mandir

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.