AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल; कुणी टीकास्त्र डागलं? वाचा…

ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा, असं ते म्हणालेत.

नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, सगळं सत्य समोर येईल; कुणी टीकास्त्र डागलं? वाचा...
नारायण राणे
| Edited By: | Updated on: Jan 02, 2023 | 3:16 PM
Share

सिंधुदुर्ग : सत्य समोर आणायचं असेल. रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, बाळा या सगळ्यांच्या हत्यांच्या खोलाशी जायचं असेल तर नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा. नितेश राणेंना सोडा, नारायण राणेंची (Narayan Rane) नार्कोटेस्ट केली तर अंकुश राणेला कुठे मारलं,कुठे जाळलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येतील, असं ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले आहेत.

ठाकरेगटाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करा, असं ते म्हणालेत.

सर्वसामान्य लोकांना नोटबंदीचे परिणाम आजही भोगावे लागतात.नोटबंदीमुळे लोकांना त्रास झाला.आपल्याच हक्काच्या पैशांसाठी रांगेत उभं राहावं लागलं. त्यामुळे या निर्णयाविरोधात लोकभावना आहेत, असंही विनायक राऊत म्हणालेत.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य वादात अडकलं आहे. त्यावरही विनायक राऊत बोललेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर आहेत आणि स्वराज्यरक्षकही आहेत, असं ते म्हणालेत.

संजय राऊत यांचं भाषण म्हणजे निव्वळ बडबड, अशी टीका भागवत कराड यांनी केली आहे. त्यावरही विनायक राऊत बोललेत.संजय राऊत यांच्या एक एक वाक्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघतं.मीडियाच्या सकाळच्या बातम्या या संजय राऊत यांच्या अग्रलेखाने सुरू होतात,हे काय कमी आहे का?, असा सवालही त्यांनी केलाय.

नौटंकी करणाऱ्या भाजपच्या नेत्यांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.ही असंच गल्लीबोळात बरळत राहतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वैभव नाईक यांनीही नितेश राणेंवर टीका केली आहे.नितेश राणेंनी या आधी ही अनेकदा आरोप केलेत.पूर्वी नथुराम गोडसेच्या विरोधात बोलायचे आता बाजूने बोलता आहेत.नितेश राणे मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या भूमिका बदलत आहेत.पण नितेश राणे कितीही अजित पवारांवर बोलले,आदित्य ठाकरेंवर बोलले तरी भाजप नितेश राणेंना कधी ही मंत्री करणार नाहीत, असं वैभव नाईक म्हणालेत.

शिंदेगट आणि भाजपचा आदित्य ठाकरेंनी घाम काढला आहे.ज्या पद्धतीने सर्वजण आदित्य ठाकरेंना टार्गेट करता आहेत. त्यातच आदित्य यांचा विजय आहे.महाराष्ट्रातील जनता,तरुण,सर्व शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या पाठीशी आहेत.आरोप करण्यापेक्षा चौकशी करा. सत्य समोर येईल, असं वैभव नाईक म्हणालेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....