AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच : विनायक राऊत

बुडत्याला काडीचा आधार, असा टोला विनायक राऊतांनी नारायण राणेंना लगावला. (Vinayak Raut slams Narayan Rane ministry )

राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला केंद्रात मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर दुर्दैवच : विनायक राऊत
नारायण राणे आणि विनायक राऊत
| Updated on: Feb 09, 2021 | 11:49 AM
Share

सिंधुदुर्ग : खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी टोला लगावला. एवढ्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या एका नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल, अशी बोचरी टीका विनायक राऊतांनी केली. बुडत्याला काडीचा आधार, असा टोलाही राऊतांनी लगावला. (Vinayak Raut slams rumors of Narayan Rane getting ministry in Central Govt)

नारायण राणे  यांनी एकदा नव्हे, तर तीन वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना फोन केला होता. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारुन घेतलं. नारायण राणे गृहमंत्री अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी आधीही टीका केली होती.

“राणेंच्या कंगालपणामुळे प्रस्ताव रखडला”

“राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे” असा निशाणाही विनायक राऊत यांनी साधला.

“शाह-राणेंची युती लाईफ टाईम टिको”

“नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची” अशी टीकाही राऊतांनी केली.

संबंधित बातम्या :

सिंधुदुर्गातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील परवानग्यांसाठी भाजप नेते नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन

याला चिंधी विचार म्हणतात साहेब, निलेश राणेंचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल

राणेंनी उद्धव ठाकरेंना एकदा नाही, तीनदा फोन केला, राऊतांचा दावा

(Vinayak Raut slams rumors of Narayan Rane getting ministry in Central Govt)

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.