‘पवारांनी केंद्रात सरकारमध्ये असताना महाराष्ट्रासाठी काय केले?’

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विकासावर फार बोलतात. ते मोठे नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री अशा विविध पदांवर काम केले. 50 वर्षे सत्तेत राहण्याची कला फक्त पवारांकडेच आहे. मात्र, मोदी सरकारच्या आधी 10 वर्षे केंद्रात असताना पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे सांगावे, अशी विचारणा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली. शाह म्हणाले, ‘आघाडीच्या काळात […]

‘पवारांनी केंद्रात सरकारमध्ये असताना महाराष्ट्रासाठी काय केले?’
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विकासावर फार बोलतात. ते मोठे नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्री अशा विविध पदांवर काम केले. 50 वर्षे सत्तेत राहण्याची कला फक्त पवारांकडेच आहे. मात्र, मोदी सरकारच्या आधी 10 वर्षे केंद्रात असताना पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले हे सांगावे, अशी विचारणा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली.

शाह म्हणाले, ‘आघाडीच्या काळात महाराष्ट्राला 1 लाख 15 हजार कोटी रुपये मिळाले, तर मोदींनी केवळ 5 वर्षांमध्ये 4 लाख 38 हजार 760 कोटी रुपये दिले. निवडणुका संपताच पुरंदर विमानतळाच्या कामालाही सुरुवात करु. तसेच मेक इन इंडियाच्या माध्यमातून नवीन गुंतवणूकही सुरु केली आहे.’

‘जनतेने आता पवारांकडे हिशोब मागावा’

शरद पवार यांनी बारामती, पुण्यासाठी काय केले हे सांगावे. तसेच जनतेनेही आता पवारांकडे हिशोब मागावा, असे आवाहन अमित शाह यांनी केले. आमचे उमेदवारही निवडून आल्यानंतर त्यांच्या 5 वर्षांचा हिशोब देतील, असेही आश्वासन शाह यांनी यावेळी दिले.

‘मोदींनी देशाला सुरक्षित करण्याचे सर्वात महत्त्वाचे काम केले’

काँग्रेस सरकारच्या 10 वर्षांच्या काळात कोणीही पाकिस्तानातून भारतात यायचे आणि हल्ले करायचे. सैन्याला अपमानित करायचे. तरिही मौनीबाबा काहीच बोलत नव्हते. मात्र, मोदी सरकारच्या काळात असे राहिले नाही, असे म्हणत शाह यांनी पंतप्रधान मोदींनी देशाला सुरक्षित केल्याचा दावा केला.

‘राहुल गांधी देशाच्या लष्करावर शंका घेतात’

शहीद जवानांच्या तेराव्या दिवशी आपण पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केले. या स्ट्राईकनंतर सर्वत्र आनंद होता, मात्र दोनच ठिकाणी दु:ख होते. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरे राहुलबाबा. ते देशाच्या लष्करावर शंका घेतात. राहुल गांधी आणि शरद पवार दहशतवाद्यांशी चर्चा करायला सांगतात. मात्र भाजप ‘ईट का जवाब पत्थर से देगा’ म्हणत आता आपण चर्चा करत बसणार नसल्याचे शाह यांनी सांगितले. शरद पवार, राहुल गांधी, फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला एकत्र बसतात. ते काश्मीरला स्वतंत्र पंतप्रधान करु म्हणतात. त्यांना देशचे तुकडे करायचे आहेत, असाही आरोप शाह यांनी केला.

Non Stop LIVE Update
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.