AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांचे काय होणार?

मनसेच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो. हे पोस्टर लागलंय दादरच्या शिवसेना भवनाबाहेर.

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र आले तर उद्धव ठाकरे यांचे काय होणार?
| Updated on: Oct 21, 2022 | 11:37 PM
Share

मुंबई : सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच मनसेच्या पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो झळकलाय. मनसेकडून दादरच्या शिवाजी पार्कात आयोजित केला जाणारा दिपोत्सव. विशेष म्हणजे मनसेनं शिंदे आणि फडणवीसांच्या स्वागताचं हे बॅनर बरोब्बर शिवसेना भवनाच्या समोर लावण्यात आले आहे. सत्ताबदलानंतर राज ठाकरेंच्या कधी शिंदे गटासोबत तर कधी भाजप नेत्यांसोबत अनेक बैठका झाल्या. आता तिन्ही नेते एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

30 जूनला शिंदे-भाजप सरकारचा शपथविधी झाला. म्हणजे मविआ सरकार जाऊन नव्या सरकारची सुरुवात झाली. त्यानंतर 29 ऑगस्टला राज ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गेले. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.

या नंतर 15 जुलैला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. 1 सप्टेंबरला गणपती दर्शनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या घरी गेले.

त्यानंतर 6 सप्टेंबरला राज ठाकरे गणपती दर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. गेल्या आठवड्यात राज ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले. त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे आशिष शेलारांनी राज ठाकरेंच्या घरी जात त्यांची भेट घेतली त्यानंतर काही वेळानं शिंदे गटाचे आमदार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत राज ठाकरेंच्या घरी पोहोचले.

पुन्हा 19 ऑक्टोबरला शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर राज ठाकरेंच्या घरी पोहोचले. जर सत्ताबदलानंतर सगळ्या छोट्या-मोठ्या भेटीचा तपशील बघितला तर मागच्या तीन महिन्यात शिंदे-भाजप सरकार आणि राज ठाकरेंमध्ये 10 हून जास्त भेटी झाल्या आहेत.

जर टीका आणि कौतुकाचे मुद्दे बघितले तर राज ठाकरेंनी मागच्या अनेक महिन्यात बडे भाजप नेते किंवा त्यांच्या भूमिकांवर टीका केलेली नाही.

दसरा मेळाव्याच्या अपवाद वगळता मनसे नेत्यांनी शिंदे गटाविरोधातही भूमिका घेतलेली नाही. याउलट जेव्हा अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपनं माघारीचं कारण देताना राज ठाकरेंच्या पत्राला महत्वाचं मानलं आणि शिंदे गटाकडूनही तेच कारण देण्यात आलं.

भेटींमागे सदिच्छांचं कारण दिलं जात असलं तरी आगामी मुंबई महापालिका शिंदेंसोबत उद्धव ठाकरे, भाजप आणि मनसेसाठीही महत्वाची आहे.

जर राज ठाकरेंनी साथ शिंदे आणि भाजपला मिळाली तर काही प्रमाणात मराठी मतं विभागली जाऊ शकतात आणि तो तोटा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.