राहुल गांधी नांदेडमधून लढल्यास ते जिंकतील?

नांदेड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातील एक मतदारसंघ अर्थात उत्तर प्रदेशातील अमेठी आहे. मात्र, दुसऱ्या मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. नांदेड हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. देशात मोदी लाट असतानाही या जागेवरुन अशोक चव्हाणांच्या रुपाने खासदार निवडून […]

राहुल गांधी नांदेडमधून लढल्यास ते जिंकतील?
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:35 PM

नांदेड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं दोन मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातील एक मतदारसंघ अर्थात उत्तर प्रदेशातील अमेठी आहे. मात्र, दुसऱ्या मतदारसंघासाठी महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे. नांदेड हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे. देशात मोदी लाट असतानाही या जागेवरुन अशोक चव्हाणांच्या रुपाने खासदार निवडून आला. त्यामुळे इथून लढणे राहुल गांधी यांच्यासाठी सुरक्षित मानले जात आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी अतिशय सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. नेमका नांदेड लोकसभेचा मतदारसंघ किती सुरक्षित आहे, याचा आढावा टीव्ही 9 मराठीने घेतला.

नांदेड काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला

नांदेड लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यापैकी नांदेड दक्षिणवर शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांचा विजय झाला होता. तर मुखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार गोविंद राठोड यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र तुषार राठोड विजयी झाले होते. तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या देगलूरमधून शिवसेनेचे सुभाष साबने हे आमदार आहेत. तर उरलेल्या नांदेड उत्तर, भोकर, आणि नायगावात काँग्रेसचे आमदार आहेत. हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसचे गड आहेत.

सातव-चव्हाण यांच्यातील दुरावा कारणीभूत?

नांदेडमधील बहुतांश स्थानिक स्वराज संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी नांदेड लोकसभा हा सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांच्यातील संबंधात काहीसा दुरावा आलेला असल्याने त्यांनीच राहुल गांधींसाठी नांदेड लोकसभेचा पर्याय सूचवलेला असावा, अशीही चर्चा आहे.

राहुल यांच्यासाठी अशोक चव्हाण जीवाचं रान करतील!

तूर्त नांदेड लोकसभेसाठी अमिता अशोक चव्हाण यांना निवडणुकीसाठी उभे करावे, अशी मागणी केली जाते आहे. त्यातून राहुल गांधींना इथे उभं केल्यास अशोक चव्हाण जीवाचं रान करत राहुल गांधींना निवडून आणतील, असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नांदेड लोकसभेसाठी राहुल गांधींचा विचार केला जातोय. मात्र तसं झालं तर भाजपदेखील तगड्या उमेदवाराला रिंगणात उतरवू शकते, अशीही माहिती आहे.

वाचा – नांदेड लोकसभा : अशोक चव्हाणांची यंदा मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें