Yavatmal-Washim Lok sabha result 2019 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निकाल

Yavatmal-Washim Lok sabha result 2019 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ निकाल
यवतमाळ-वाशिम : भावना गवळी

यवतमाळ-वाशिम लोकसभा : यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेच्या भावना गवळी विजयी झाल्या. येथे पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान झालं होतं. इथे यंदा 61.09  टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का 2.29 टक्क्यांनी वाढला. या मतदारसंघात शिवसेनेकडून भावना गवळी, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात 2014 मध्ये काँग्रेसचे शिवाजी मोघे यांचा पराभव करीत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी बाजी मारली होती. मात्र 2019 च्या लढतीत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेच्या भावना गवळी यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाभावना गवळी (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीमाणिकराव ठाकरे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरप्रो. प्रवीण पवार (VBA)पराभूत

विदर्भातील प्रमुख लढतीपैकी एक

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून 1999 पासून सतत चार वेळा सेनेच्या भावना गवळी यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. स्वतंत्र वाशिम मतदार संघात दोन वेळा आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघात दोन वेळा अशा सलग चार वेळा विजयी ठरलेल्या भावना गवळी यांची या निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासोबत लढत आहे. मराठा, बंजारा आणि मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघातील जातीय समीकरण माणिकरावांच्या उमेदवारीने काही प्रमाणात बदलणार आहे.

मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2014 च्या तुलनेत यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदारसंघात दोन टक्यांनी मतदानाची आकडेवारी वाढली आहे.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ- विधानसभा मतदारसंघ मतदार व मतदान 

2019 मधील मतदान %

◆वाशिम विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 8 हजार 583 मतदारांनी (60.40 टक्के)

◆कारंजा विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 71 हजार 584 (57.45 टक्के)

◆राळेगाव विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांच्या सर्वाधिक 1 लक्ष 96 हजार 758 (69.91 टक्के)

◆यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 5 हजार 386 (54.12 टक्के)

◆दिग्रस विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 7 हजार 248 (64.69 टक्के)

◆पुसद विधानसभा मतदारसंघात 1 लक्ष 80 हजार 247 (62.27 टक्के)

लोकसभा मतदारसंघात एकूण 19 लक्ष 14 हजार 785 मतदार आहेत. यापैकी 11 लक्ष 69 हजार 806 मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावला. ही टक्केवारी एकूण मतदारांच्या 61.09 टक्के एवढी आहे. त्यामुळे 2014 च्या तुलनेत इथं मतदानात दोन टक्यांनी वाढ झाली. यात सर्वाधिक 69.91 टक्के मतदान राळेगाव विधानसभा मतदासंघातील आहे. तर यवतमाळ विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 54.12 टक्के मतदान झाले.

यंदाच्या निवडणुकीतील वैशिष्ट्ये

1)धनंजय मुंडे सभा – अच्छे दिन चे स्वप्न दाखविणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारने आपल्या कार्यकाळात स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल सारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड भाववाढ करून सामान्य माणसाला लुबाडण्याचे काम केले आहे. समाजातील कुठल्या घटकांच्या हिताचे नसलेल्या या सरकारला कायम हद्दपार करण्याकरिता काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांच्या आघाडीला विजयी करण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील  काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्या प्रचारा निमित्य वाशीम येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.

2)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभा – लोकसभेची निवडणूक ही सामान्य निवडणूक नसून, डोळ्यात तेल घालून अहोरात्र देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पराक्रमावर अविश्वास व्यक्त करणाऱ्या नाकर्त्या  लोकांच्या हाती देशाची सत्ता द्यायची की सर्वस्वाचा त्याग करून देशहिताला प्राधान्य देणाऱयांच्या हातात देशाची सत्ता द्यायची, हे ठरवणारी ही निवडणूक असल्याचे मत, मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघातील भाजपा सेना युतीच्या उमेदवार भावना गवळी याच्या वाशीम येथील प्रचार सभेत ते बोलत होते. या दोन सभा वाशिम येथे झाल्यात.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघ

1) शिवसेनेच्या भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. गवळी यांनी 1999मध्ये जेव्हा पहिली वाशिम लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्या अवघ्या 25 वर्षांच्या होत्या आणि पहिल्या निवडणुकीतच विजयी माळ त्यांच्या गळ्यात पडली. काँग्रेसचे अनंतराव देशमुख यांचा पराभव करत त्यांनी विजय मिळवला.

2) 2004 मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकर नाईक परिवारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर नाईक या यवतमाळ जिल्ह्यातील नाईक घराण्यातील दिग्गज नेत्याला हरवत दुसऱ्यांदा विजय साजरा केला.

3) यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ 2009 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निर्माण झाला. तत्पूर्वी यवतमाळ आणि वाशिम हे दोन वेगळे मतदारसंघ होते. यवतमाळ मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं.

4) 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांनी एकूण 3 लाख 84 हजार 443 मते पडली. तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार हरीसिंग राठोड यांच्या पारड्यात एकूण 3 लाख 27 हजार 492 मते पडली. भावना गवळी यांनी तब्बल 56 हजार 951 मताधिक्याने विजय मिळवला होता.

4) 2014 च्या यवतमाळ-वाशीम हा लोकसभा मतदारसंघात शिवसेना भावना गवळी यांना4 लाख 77 हजार 905 मते मिळाली होती. तर त्या 93 हजार 816 च्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांना 3 लाख 84 हजार 089 इतक्या मतांनी पराभूत झाले होते.

विशेष म्हणजे पुनर्रचना होण्याआधी हा मतदारसंघ यवतमाळ होता. तेव्हा सलग 6 वेळा स्व. उत्तमराव पाटील यांनी या ठिकाणचे प्रतिनिधीत्व केले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला यवतमाळ लोकसभा मतदारसंघ 2 वेळ भाजपच्या ताब्यात होता. तर गेल्या 2 वेळा शिवसेनेच्या भावना गवळी यांनी वाशीम जोडल्यानंतर 2 वेळा प्रतिनिधीत्व केलं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI