Pulwama Attack: हिंजवडी 'आयटी हब'ला 'हाय अलर्ट', सुरक्षा वाढवली

पुणे: पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अलर्ट थेट केंद्रीय सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आला आहे. आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली कार्यालयाकडून ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आल्याने, हिंजवडी येथील आयटी हबची सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क …

Pulwama Attack: हिंजवडी 'आयटी हब'ला 'हाय अलर्ट', सुरक्षा वाढवली

पुणे: पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडजवळच्या हिंजवडीतील आयटी हबमध्ये ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा अलर्ट थेट केंद्रीय सुरक्षा बलाच्या मुख्य कार्यालयाकडून देण्यात आला आहे. आयटी हबमध्ये केंद्रीय सुरक्षा बलाच्या दिल्ली कार्यालयाकडून ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देण्यात आल्याने, हिंजवडी येथील आयटी हबची सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाली आहे.

परदेशी कंपन्यांमुळे हिंजवडी आयटी हबला अतिरेकी संघटनांपासून धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली. त्यामुळे कंपन्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवनांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर कमांडर खेतान यांनी हिंजवडी इथे तैनात असलेल्या सुरक्षा बलाच्या जवानांची तातडीने बैठक घेतली. त्यांतर इथे सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

पुलवामामध्ये आज पुन्हा चकमक, चार जवान शहीद

जम्मू -काश्मीरमधील पुलवामा इथे दहशतवाद्यांनी आज पुन्हा एकदा हल्ला केला. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये एका मेजरचाही समावेश आहे. काल रात्रीपासून पुलवामा परिसरात ही चकमक सुरु होती. या चकमकीत जवानांसह काही स्थानिक नागरिकांचांही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

चारच दिवसांपूर्वी पुलवामामध्ये हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 40 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आला. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान होते.

संबंधित बातम्या 

 पुलवामात पुन्हा हल्ला, चार जवान शहीद   

पुलवामा हल्ल्याचा बदला कसा घ्यायचा? लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणतात… 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *