पुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु

रविवारी (31 मे) पहाटेपासून पुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला पुन्हा सुरु होणार आहे (Pune Fruit and vegetable market).

पुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला मार्केट रविवारपासून सुरु

पुणे : रविवारी (31 मे) पहाटेपासून पुण्यातील मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला पुन्हा सुरु होणार आहे (Pune Fruit and vegetable market). शनिवारी रात्रीपासून शेतमाल आवक सुरु होईल. यानंतर रविवारी पहाटेपासून फळ आणि भाजीपाला विक्री पूर्ववत सुरु होणर आहे. गेल्या 50 दिवसांपासून फळ आणि भाजीपाला बाजार ठप्प होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून बाजार बंद करण्यात आला होता. मात्र, आता काही अटींसह बाजार सुरु होणार आहे. बाजारात 50 टक्केच व्यापारी कर्मचारी राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांना आता दररोज भाजीपाला-फळं मिळणार आहेत. मार्केट यार्ड प्रशासन, अडते असोसिएशन, कामगार आणि वाहतूक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

एका आडत्याला शेतमालाचे एकच वाहन बोलण्याची परवानगी आहे. रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत शेतमाल घेऊन येणार्‍या वाहनास प्रवेश दिला जाईल. शेतमाल गाड्यावर खाली झाल्यावर रिकामे वाहन त्वरित बाजाराच्या बाहेर नेण्याच्या सुचना आहेत.

बाजार आवारातील शेतीमालाची विक्री पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत

बाजार आवारातील गाळ्यांच्या बहिर्गोल पाकळीच्या बाहेरच्या बाजूचे गाळेधारक एका दिवशी, तर आतील बाजूचे व्यापारी पुढील दिवशी दिवसाआड पद्धतीने बाजार सुरु करतील. यामुळे बाजारात केवळ 50 टक्केच उपस्थिती राहणार आहे. अडते कामगार यांना ओळखपत्र दिले जाणार आहे. शेतमाल घेऊन जाणारी वाहने दुपारी 12 वाजल्यानंतर बाजार आवाराच्या बाहेर काढली जातील. बाजार आवारातील शेतीमालाची विक्री पहाटे 5 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होईल. त्याचबरोबर बाजार आवारात मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क शिवाय प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. शारिरीक अंतर पाळण्याचं बंधन असून अडत्यांना ठरवून दिलेल्या वेळेतच शेतमालाची विक्री करावी लागेल.

केवळ घाऊक विक्री करणे बंधनकारक राहील. दुबार आणि किरकोळ विक्री करता येणार नाही. कंटेनमेंट भागातील कोणत्याही कर्मचाऱ्यास/खरेदीदार आणि वाहनचालकास बाजार परिसरात प्रवेशास मनाई असणार आहे.

संबंधित बातम्या :

Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट

Pimpri Chinchwad | निगडी-आकुर्डीत 180 कोरोनाग्रस्त, पिंपरीत कोणत्या प्रभागात किती?

गड्या आपला गाव बरा! महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सव्वा लाख पुणेकर परतले

संबंधित व्हिडीओ :


Pune Fruit and vegetable market

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *