Horoscope 14 May 2022: कठीण प्रसंगात परिवाराची साथ, प्रकृती संभाळा

Horoscope 14 May 2022: कठीण प्रसंगात परिवाराची साथ, प्रकृती संभाळा

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 5:00 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे (Daily Horoscope) आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

मेष –

कामात जास्त बिझी असाल. कोणत्यातरी चाललेल्या जुन्या प्रश्नाची उत्तरं मिळतील. धावपळ जास्त असेल. पण, त्याचे परिणाम देखील चांगले मिळतील. ज्याने तुम्ही पुन्हा सकारात्मक व्हाल आणि कामात अधिक लक्ष द्याल. सर्व कामात अधिक सफल होण्याकरिता जास्त मेहनतीची गरज आहे. भाग्याच्या भरोवस्यांवर राहिलात तर चांगल्या संधी हातून जातील. तुमचे जवळचेच काही लोक तुमच्यावर जळत असतील त्याने ते तुमच्या विषयी वाईट बोलतील आणि गैरसमज निर्माण करतील. व्यवसायात तुम्ही जे काम अवघड समजून सोडून देत होता त्यावर पुन्हा काम करायला सुरवात करा. चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली सरकारी कामं होतील. ऑफिसमध्ये कामात तणाव नसेल.

लव फोकस – कौटुंबिक वतावरण आणि ताळमेळ, सामंजस्य योग्य राहील. प्रेम प्रकरणात एकमेकांच्या भावनांचा सन्मान राखा.

खबरदारी – साथीच्या आजारापासून काळजी घ्या. सर्दी, खोकला सतावतील. आयुर्वेदीक गोष्टींचे जास्त सेवन करा.

शुभ रंग – नीळा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 1

वृषभ –

तुमच्यातील सुप्त गुण ओळखा. त्याने तुमची मानसिक स्थिती खूप सकारात्मक राहील. आवडती व्यक्ती घरात आल्याने घरातील वातावरण आनंददायी असेल. मुलंच्या समस्या सोडवा. घाईत घेतलेला निर्णय चुकू शकतो. संपत्ती संबंधीत कोणावर विश्वास ठेवू नका. तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. घाईत निर्णय घेणं त्रासदायक होवू शकतं. मालमत्तेच्या बाबतीत कोणावर अधिक विश्वास ठेवू नका. तुमच्या निर्णयालाच प्राधान्य द्या. त्याने फायदा होईल. अहंकार आणि जिद्दीमुळे लाभदायक संधी हातून जातील. यावेळी व्यवसायात अति दक्षता बाळगणं गरजेचं आहे. अचानक झालेल्या खर्चामुळे तुम्ही टेंशन मध्ये असाल. आर्थिक बाबतीत कोणत्याही कर्मचाऱ्यावर तसंच सहकाऱ्यावर विश्वास ठेवू नका. सर्व निर्णय स्वत: च घेणं चांगलं.

लव फोकस – कठीण काळात परिवार सोबत असेल. प्रेम प्रकरणात निराशेचा सामना करावा लागू शकतो.

खबरदारी – एलर्जी आणि पोटाचे विकार उद्भवतील. दुषित वातावरण तसंच खाण्या पिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या.

शुभ रंग –लाल

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 6

मिथुन –

विचारपूर्वक निर्णय घ्या. तु्म्हाला यश नक्की मिळेल. मोठ्याचे मार्गदर्शन तुम्हाला नक्की कामाला येईल. कल्पानिक आणि स्वप्नाच्या दुनियेत बाहेर पडा. फायनान्स संबंधी तुमच्याकडे कादी योजना असेल तर योग्य विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. तुम्ही फसवले जाऊ शकता. कुटंबात लहान सहान गोष्टींवरून तणावाचे वातावरण राहील. व्यापाराच्या दृष्टीने परिस्थिती योग्य आहे. त्यामुळे तुमचं लक्ष तुमच्या व्यवसायावर केंद्रित करा. शेअर तसंच तेजी मंदी इत्यादी गोष्टींपासून सावधान रहा. गुंतवणूकी संबंधी निर्णय थोडे थांबवलेलेच बरे.

लव फोकस – वैवाहिक जीवनात सुख राहील. प्रेम प्रकरणात ही भावनिक वाढेल.

खबरदारी – प्रकृतीच्या त्रासापासून थोडा वेळ मिळेल. पण महिला वर्गाने त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जास्त सावधानी बाळगणं गरजेचं आहे.

शुभ रंग – हिरवा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें