Astrology: लग्न करायचे आहे पण पत्रिका जुळत नाही? ‘नो टेन्शन’ अशा पद्धतीने करा वैवाहिक जीवनातील दोष दूर

बऱ्याचदा पत्रिका जुळत नसल्याने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करता येत नाही, पण जोतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहे. प्रेमात अडथळे येत असतील तर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र परिधान करून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी.

Astrology: लग्न करायचे आहे पण पत्रिका जुळत नाही? 'नो टेन्शन' अशा पद्धतीने करा वैवाहिक जीवनातील दोष दूर
कुंडली मिलन Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 5:00 PM

सध्याच्या काळात तरुण पिढी  आवडीनुसार लग्न करतात. मात्र लग्न बंधनात अडकण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कुटुंबियांचा विरोध असल्यामुळे अनेकदा वेगळं व्हावं लागतं. घर, समाजच नाही तर ग्रह आणि नक्षत्रांमुळे प्रेमात अडथळे येतात. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर ज्योतिषशास्त्रातील उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. जर तुम्हाला प्रेमानंतर लग्न करायचे असेल तर हे ज्योतिषीय उपाय करा. बऱ्याचदा पत्रिका जुळत (Kundali Matching) नसल्याने आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करता येत नाही, पण जोतिषशास्त्रात (Astrology) काही उपाय सांगितले आहे. ज्याचा अवलंब करून वैवाहिक जीवनातील दोष दूर करता येतात.

चंद्राला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी करा

कुंडलीत पाचवे घर आणि सातवे घर लग्नासाठी आहे.पाचव्या घराचा स्वामी चंद्र आहे. अशा स्थितीत चंद्राला बलवान बनवण्यासाठी चांदीच्या अंगठीत मोती घाला. यामुळे प्रेमविवाहाचा योग निर्माण होतो.

हे सुद्धा वाचा

हे रत्न घाला

जर तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल तर डायमंड किंवा ओपल घालण्याचा प्रयत्न करा. तसेच श्रावण सोमवारचे व्रत ठेवावे. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी 16 सोमवारीही व्रत करावे. तसेच जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा हे गौरी शंकर अर्धागिंनी यथा त्वं शंकर प्रिया तथा माम कुरू कल्याणी कान्त कान्ता सुदुर्लभम्’ या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.

मुलींनी हा उपाय करावा

प्रेमात अडथळे येत असतील तर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी आणि पिवळे वस्त्र परिधान करून लक्ष्मी नारायणाची पूजा करावी. तसेच स्फटिकांची माळ घालून ‘ओम लक्ष्मी नारायण नमः’ या मंत्राचा जप करावा. त्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता निर्माण होते.

गणपतीचं पूजन करा

कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या बुधवारी गणपतीची पूजा सुरू करावी आणि दर बुधवारी दुर्वा, पिवळे लाडू, सिंदूर आणि रोळीने त्यांची पूजन करावे. यामुळे हवा असलेल्या व्यक्तीसोबत लग्न होईल.

प्रेमविवाहातील अडथळा दूर करा

प्रेमविवाहात अडचण असल्यास रविवारी 7 सुपारी, 7 हळदीच्या गाठी, 7 गुळाचे खडे, 70 ग्रॅम हरभरा, 7 पिवळी नाणी आणि एक यंत्र पिवळ्या कपड्यात घेऊन पार्वती देवीच्या समोर ठेवून पूजा करावी.  तेथे 40 दिवस राहू द्या आणि नंतर प्रियकराला द्या. यामुळे प्रेमावरील दृष्टी किंवा अडथळा दूर होईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.