Daily Horoscope 3 July 2022: ‘या’ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता

मेष- आजच्या दिवशी मन प्रसन्न राहील. तसंच आर्थिक बाबींवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे. वृषभ- आजच्या दिवशी तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला दुःखी करू शकते. दरम्यान मालमत्तेशी संबंधित कोणतंही काम करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. घाईघाईने निर्णय घेणं योग्य नाही. मिथुन- आजच्या दिवशी तुम्ही कोणतंही काम पूर्ण होण्यास विलंब होऊ […]

Daily Horoscope 3 July 2022: 'या' राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता
नितीश गाडगे

|

Jul 03, 2022 | 7:04 AM

 1. मेष- आजच्या दिवशी मन प्रसन्न राहील. तसंच आर्थिक बाबींवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.
 2. वृषभ- आजच्या दिवशी तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला दुःखी करू शकते. दरम्यान मालमत्तेशी संबंधित कोणतंही काम करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. घाईघाईने निर्णय घेणं योग्य नाही.
 3. मिथुन- आजच्या दिवशी तुम्ही कोणतंही काम पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो, तरीही प्रयत्न मात्र सोडू नका. आर्थिक नियोजनात काही अडथळे येऊ शकतात. ही अडचण वेळेत दूर होईल.
 4. कर्क- हा दिवस चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुमचा निर्णय खूप फायदेशीर ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला असून चांगली बातमी मिळेल. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील.
 5. सिंह- आजच्या दिवशी मनावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक बाबींमुळे चिंता सतावून मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळणं चांगलं होईल.
 6. कन्या- पैसे मिळण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ आहे. मित्रांकडून लाभाचे संकेत आहेत. प्रियजनांसोबतची भेट आनंददायी होणार आहे. व्यवसायात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
 7. तूळ- आजचा दिवस शुभ असणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि गोडवा वाढणार आहे.
 8. वृश्चिक- शारीरिक थकवा, आळस आणि मानसिक चिंता जाणवण्याची अधिक शक्यता आहे. तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. विरोधकांशी अधिक वाद घालू नका. आजच्या दिवशी अनावश्यक खर्च वाढतील.
 9. धनु- आजच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरु करू नका. तुमच्या भाषेवर संयम ठेवा. नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. आरोग्याची आज काळजी घ्या.
 10. मकर- मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटू शकते. ऑफिसच्या कामात यश मिळणार आहे. विचारांमध्ये थोडी अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.
 11. कुंभ- आजच्या दिवशी तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. कामात यश मिळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ चांगला जाणार आहे.
 12. मीन- आज ऑफिसमध्ये कामावर एकाग्रता ठेवा. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें