Daily Horoscope 5 July 2022: ‘या’ राशींच्या लोकांना मिळणार अनपेक्षित लाभ

मेष-  सामाजिक कार्यांमध्ये आज तुमचा सहभाग असेल. आर्थिक कामांना वेग मिळेल. इतरांशी साधलेला संवाद यशस्वी ठरेल. वृषभ- एखादी मौल्यवान भेट मिळणार आहे. नव्या नोकरीची संधी मिळणार आहे. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटेवर जाण्याची संधी आहे. मिथुन- अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रशासनाची साथ असल्यामुळं तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. जवळच्या […]

Daily Horoscope 5 July 2022: 'या' राशींच्या लोकांना मिळणार अनपेक्षित लाभ
नितीश गाडगे

|

Jul 05, 2022 | 8:26 AM

 1. मेष-  सामाजिक कार्यांमध्ये आज तुमचा सहभाग असेल. आर्थिक कामांना वेग मिळेल. इतरांशी साधलेला संवाद यशस्वी ठरेल.
 2. वृषभ- एखादी मौल्यवान भेट मिळणार आहे. नव्या नोकरीची संधी मिळणार आहे. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटेवर जाण्याची संधी आहे.
 3. मिथुन- अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. प्रशासनाची साथ असल्यामुळं तुम्हाला पुढे जाण्याची संधी आहे. जवळच्या व्यक्तींशी असणारं नातं आणखी दृढ होईल.
 4. कर्क- एखादी महत्त्वाची बातमी कळेल. धनलाभाचा योग आहे. विवाहप्रस्ताव येणार आहेत. यातूनच कोणा एका व्यक्तीला तुमची पसंती मिळेल.
 5. सिंह- सध्याची वेळ तुमच्या फायद्याची आहे. आर्थिक कामं प्रगतीपथावर असतील. धनाढ्य होण्याची संधी आहे. वरिष्ठांची तुमच्यावर कृपा असेल.
 6. कन्या- करिअर आणि नोकरीमध्ये नव्या आणि तितक्याच फायद्याच्या संधी तुम्हाला मिळणार आहेत. एखादा प्रवासयोग आहे. नोकरीच्या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे.
 7. तुळ- नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मित्रांची मोलाची मदत होणार आहे. आज अशी शुभवार्ता कळेल जी आयुष्य बदलणार आहे. प्रलंबित कामं मार्गी लावा.
 8. वृश्चिक- अनपेक्षित फायदा मिळण्याची संधी आहे. नित्यनियमानं करता ती कामं सुरुच ठेवा. दिवस शुभ आहे.
 9. धनु- निर्धारित लक्ष्य गाठण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जवळच्या व्यक्तींशी असणारं तुमचं नातं दृढ होणार आहे. इतरांचा विश्वास जिंकाल.
 10. मकर- दैनंदिन कामांमध्येच एखादी आनंदाची बातमी मिळेल. शुभवार्ता कळणार आहे. व्यवहार चातुर्य कायम ठेवा.
 11. कुंभ- स्वत:वर विश्वास ठेवा. आत्मविश्वास बळावेल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीची संधी आहे. कामात काटेकोरपणा ठेवा.
 12. मीन- नाती आणि घट्ट होतील. वादांपासून दूर राहा. दिवस शांत आणि तितकाच सकारात्मक असेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें