AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 जानेवारीला तयार होतोय गजकेसरी योग, चंद्र-गुरुची स्थिती या राशींना ठरणार लाभदायी

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक क्षणाला घडामोडी घडत असतात. कधी ग्रह या राशीत तर कधी राशीत संक्रमण करत असतो. त्यात ग्रहांची दृष्टीही महत्त्वाची ठरते. त्यामुळे प्रत्येक दिवस काही सारखा नसतो. प्रत्येक दिवशी आयुष्यात काही ना काही घडत असतो. ग्रहांच्या प्रभाव बरीच गणितं बदलतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

18 जानेवारीला तयार होतोय गजकेसरी योग, चंद्र-गुरुची स्थिती या राशींना ठरणार लाभदायी
चंद्र आणि गुरुच्या युतीमुळे शुभ असा गजकेसरी योगाची स्थिती, 18 जानेवारीपासून या राशींना मिळणार बळ
| Updated on: Jan 08, 2024 | 3:07 PM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं महत्त्व आहे. राहु आणि केतु हे ग्रह सोडले तर प्रत्येक ग्रहाकडे कोणत्या ना कोणत्या राशीचं स्वामित्त्व आहे. त्यात काही ग्रहांचं एकमेकांशी पटत नाही. मग शत्रूचं स्वामित्व असलेल्या राशीत प्रवेश केला की त्याचा आणखी वेगळा प्रभाव असतो. दुसरीकडे, गोचर केलेला ग्रह कोणत्या स्थानात विराजमान आहे यावरूनही भाकीत केलं जात. ज्योतिषशास्त्रात 12 स्थानं सांगितली गेली आहेत. त्यावरून ग्रहांचा प्रभाव कसा पडणार हे सांगितलं जातं. असं सर्व गणित असताना गोचर कुंडलीत शुभ असा गजकेसरी योग तयार होत आहे. त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल. 18 जानेवारीला चंद्र ग्रह मेष राशीत प्रवेश करेल. या राशीत गुरु ग्रह असल्याने युती होत गजकेसरी योग तयार होईल. कृष्णपक्षातील अष्टमीतला चंद्र असल्याने त्याची कला कमी होत जाईल हे देखील महत्त्वाचं आहे. एकंदरीत शुभ असल्याने राशीचक्रातील तीन राशींवर प्रभाव पडेल. कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेूऊयात..

या तीन राशींना मिळणार लाभ

मेष: य राशीच्या पहिल्या म्हणजेच लग्न स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे त्याचा थेट प्रभाव व्यक्तिमत्त्वावर पडेल. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. समाजात मानसन्मान प्राप्त होईल. लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून भारावून जाल. कौटुंबिक पातळीवर तुमचे संबंध आणखी दृढ होतील. करिअरमधील काही गोष्टी सहजरित्या मिळतील.

मकर : या राशीच्या चतुर्थ स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. हे स्थान वाहन आणि प्रॉपर्टीशी निगडीत आहे. त्यामुळे भौतिक सुखांची अनुभूती होईल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. तसेच जे लोक रियल इस्टेट, जमीनीशी निगडीत व्यवसाय करतात त्यांना फायदा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना काही भेटवस्तू मिळू शकतात.

मीन : या राशीच्या धन आणि वाणी स्थानात गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे शुभ अशा गजकेसरी योगाचा लाभ होईल. अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. भौतिक सुखांची अनुभूती होईल. कौटुंबिक पातळीवरील काही वाद दूर होतील. आपल्या वक्तव्याचा सकारात्मक प्रभाव समोरच्या व्यक्तींवर पडेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.