भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव! बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षात वर्तवलं तसं झालं तर मग…
बाबा वेंगा हे नाव सोशल मीडियामुळे सर्वांच्या परिचयाचं झालं आहे. कारण त्यांनी केलेली भाकीत आतापर्यंत खरी ठरताना दिसत आहे. त्यांनी 2025 मध्ये एक भाकीत वर्तवलं होतं. या भाकीतानुसार 2025 मध्ये एक मोठं युद्ध होण्याची शक्यता आहे. तसंच आता काहीसं होताना दिसत आहे.

बाबा वेंगाच्या यांनी वर्तवलेल्या भाकीताची संपूर्ण जगभर चर्चा होत आहे. कारण आतापर्यंत वर्तवलेली भाकीतं खरी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे नवं वर्ष उजाडलं की उजाडलं की सर्वांना उत्सुकता लागून असते की या वर्षी काय होणार आहे. 2025 या वर्षीची सुरुवात तणावग्रस्त झाली आहे. त्यामुळे बाबा वेंगा यांनी 2025 या वर्षासाठी नेमकं काय वर्तवलं आहे? याबाबत चर्चा तर होणारच. बाबा वेंगा यांच्या भाकीतावर विश्वास ठेवायचा तर 2025 पासून मानवतेचं पतन होण्यास सुरुवात होईल. यासाठी युद्ध हे एक मोठं कारण असू शकते.या कारणास्तव बाबा वेंगाचं भाकित खूपच चिंताजनक असल्याचं दिसत आहे. 2022 च्या सुरुवातीला रशिया-युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पेटली होती. आजही या युद्धाची धग कायम आहे. केवळ युरोपच नाही तर संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अमेरिका, नाटो आणि युरोपियन युनियनसारख्या प्रमुख देशांच्या सहभागामुळे रशिया-युक्रेन युद्ध अधिक धोकादायक झालं.
बाबा वेंगाच्या भाकितानुसार, 2025 मध्ये युरोपातील अनेक देशांमध्ये एक भयानक युद्ध होऊ शकतं. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. रोज भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल अशा बातम्या समोर येत आहे. पहलगाम येथे 26 निप्षाप नागरिकांना मारलं. दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचं क्रूर कृत्य आहे. आतापर्यंत अनेक भ्याड हल्ले केले आणि नंतर त्याकडे पाठ फिरवून जगासमोर रडगाणं सुरु केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी होत आहे. सध्याची स्थिती पाहता युद्धाची स्थिती कधीही ओढावू शकते.
बाबा वेंगाची अनेक भाकिते आधीच खरी ठरली आहेत. मग ती कोरोना महामारी, 2004 सालची त्सुनामी आणि 9/11 चा हल्ला असो. बाबा वेंगाने आणखी काही भाकिते वर्तवली आहेत. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. यात 2043 मध्ये युरोपमध्ये मुस्लिमांचे राज्य प्रस्थापित होईल असं सांगण्यात येत आहे.बाबा वेंगाचचा जन्म 1911 मध्ये झाला. 1996 मध्ये त्यांचे निधन झाले. बाबा वेंगाने बालपणीच एका अपघातात त्यांची दृष्टी गमावली होती. मात्र त्यानंतर त्यांना भविष्य पाहण्याची दिव्यशक्ती मिळाली, असं सांगण्यात येत आहे.
