Maharashtra Political crisis : सत्तासंघर्ष महाराष्ट्रात, केंद्र बनलं गुवाहाटी, अहोम साम्राज्य, आसामच्या शिवाजी महाराजांची चर्चा का होतेय, जाणून घ्या…

ज्या ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले होते. त्या गुवाहाटीचा इतिहास पाहिल्यास ते मुघलांच्या काही काळ ताब्यात गेलं होतं. कामरुप असं गुवाहाटीला त्याकाळी म्हणायचे. गुवाहाटीत कामरुप याठिकाणी मुघलांचं राज्य होतं तर ब्रम्हपुत्रानदीच्या पलिकडे अहोम साम्राज्याचं राज्य होतं.

Maharashtra Political crisis : सत्तासंघर्ष महाराष्ट्रात, केंद्र बनलं गुवाहाटी, अहोम साम्राज्य, आसामच्या शिवाजी महाराजांची चर्चा का होतेय, जाणून घ्या...
अहोम साम्राज्यImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:51 PM

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार शिवसेनेच्याच (Shivsena) बंडखोर आमदारांमुळे अल्पमतात आलं असून राज्यात मागच्या काही दिवसांपासून सत्तासंघर्ष सुरु झालाय. यामध्ये एक गोष्ट विशेष असून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तासंघर्षाचं केंद्र आसामचं गुवाहाटी (Guwahati) बनलंय. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार गुवाहाटीमध्ये थांबले होते. आधी सूरत, त्यानंतर आसामचं गुवाहाटी आणि आता गोवा. अशी तीन ठिकाणं बंडखोर आमदारांनी बदलली. यादरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल यासोबत आसाम आणि गुवाहाटीची देखील चर्चा सुरू झालीय. यामध्ये पुन्हा एकदा आसामचे (Assam) शिवाजीराजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार लचित बोरफुकान यांची आठवण होते. त्यांना आसामचे शिवाजीराजे असं का म्हटलं जातं? महाराष्ट्र, आसाम आणि सूरतचं काय गणित आहे? इतिहासात या तिन्ही राज्यांमध्ये काय घडलंय, याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देणार आहोत….

महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेला त्यांच्या पक्षातील आमदारांनी अल्पमतात आणलं आणि सूरतला रवाना झाले. यानंतर माध्यमांमधून बातम्यांचा पाट वाहू लागला. सरकार अल्पमतात आलं, तितक्यात सूरतची चर्चा रंगली. खळबळ महाराष्ट्रात माजली होती आणि सुरुवातीला सत्तासंघर्षाचं केंद्र बनलं सूरत. याच सूरतचे आणि महाराष्ट्राचं काय इतिहास आहे ते पाहूया…

सूरत-महाराष्ट्र कनेक्शन

“महाराष्ट्राचा इतिहास-मराठा कालखंड (भाग 1) या पुस्तकानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाहिस्तेखानला पळवून लावलं होतं. इतिहासकारांच्या माहितीनुसार महाराजांना स्वराज्याची उभारणी करायाची होती. त्यासाठी त्यांना धनाची आवश्यकता होती. यासाठी शिवरायांनी सूरतचा विचार केला. ज्या सूरतमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार पळून गेले होते. तेच सूरत. सूरत हे त्याकाळी मुघलांचं मुख्य बंदर होतं. त्याठिकाणी मुघलांचा त्याकाळी व्यापार चालायचा. त्यामुळे सूरज लुटल्यास मोठ्या प्रमाणात संपत्ती काबीज करता येईल, असा विचार त्याकाळी महाराजांना आला आणि त्यांनी सूरत लुटलं. 5 जानेवारी 1664 शिवाजी महाराजांनी सूरत लुटलं.

आसाम-महाराष्ट्र कनेक्शन व्हाया आग्रा

  1. मिर्झाराजे जससिंगा आणि शिवाजी महाराज- औरंगजेबनं शिवाजी महाराजांना आग्र्याला कैदेत ठेवलं होतं. त्यावेळी मिर्झाराजे जयसिंगांनी शिवाजी महाराजांच्या केसालाही धक्का लागू दिला नाही. त्यानंतर त्यांचा मुलगा रामसिंह यानंही महाराजांना हात लावू दिला नाही. यानंतर औरंगजेबच्या कैदेतून शिवाजी महाराज सुखरुप सुटून आले. आता हे लक्षात येताच औरंगजेब खवळला आणि त्यानं मिर्झाराजे जससिंगांचा मुलगा रामसिंहाला शिक्षा म्हणून आसामच्या मोहिमेवर पाठवलं. जे आसाम आता महाराष्ट्राच्या राजकारणात खूप चर्चेत आलंय.
  2. आसामचं अहोम साम्राज्य – आसाममध्ये अहोम साम्राज्य होतं. या सम्राज्याचे प्रमुख सरदार लचित बोरफुकान हे होते. मुघल आणि अहोम सरदार लचित यांच्यात युद्ध झालं. त्याला सरायघाटचं युद्ध म्हणतात. पण मुघल हरले. लचित बोरफुकान यांच्याविषयी तुम्हाला पुढे सांगणार आहोत.
  3. गुवाहाटी – ज्या ठिकाणी शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबले होते. त्या गुवाहाटीचा इतिहास पाहिल्यास ते मुघलांच्या काही काळ ताब्यात गेलं होतं. कामरुप असं गुवाहाटीला त्याकाळी म्हणायचे. गुवाहाटीत कामरुप याठिकाणी मुघलांचं राज्य होतं (काही काळ) तर ब्रम्हपुत्रानदीच्या पलिकडे अहोम साम्राज्याचं राज्य होतं.
  4. रामसिंहाला आसाम जिंकायला पाठवलं- सरदार लचित बोरफुकान यांच्यात आणि मुघलांमध्ये युद्ध सुरू होतं. त्यावेळी लचित बोरफुकान यांनी आजारी असतानाही युद्धात भाग घेतला होता. शिवाजी महाराज कैदेतून सुटून गेले ही शिक्षा म्हणून रामसिंहाला आसाम जिंकायला पाठवलं होतं. कारण, याठिकाणचं पाणी विषारी आहे, अशी त्यावेळी औरंगजेबची समज होती. औरंगजेबला वाटलं आसाम जिंकताही येईल आणि रामसिंहाला शिक्षाही मिळेल.
  5. आसामचे शिवाजीराजे – बारफुकानांना आजही आसाममध्ये खूप मान दिला जातो. औरंगजेबला टक्कर देणारा सेनापती म्हणून त्यांना ‘आसामचे शिवाजीराजे’ म्हणून ओळखलं जातं. 24 नोव्हेंबरला ‘लचित दिवसही’ साजरा केला जातो.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल यासोबत आसाम आणि गुवाहाटीची देखील चर्चा सुरू झालीय. त्यामुळेच सूरत, आसाम, गुवाहाटी आणि महाराष्ट्र यांचं इतिहासातील कनेक्शन तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.