बेडरूममध्ये या 5 गोष्टी कधीही ठेवू नयेत, अन्यथा घरातील अडचणी वाढतील
बेडरूम हा आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण अशा काही गोष्टी असतात ज्या बेडरुममध्ये कधीही ठेवायच्या नसतात. ज्यामुळे घरात अनेक अडचणी येऊ शकतात. पाहुयात त्या कोणत्या गोष्टी आहेत ते.

बेडरूम हा आपल्या घराचा एक महत्त्वाचा भाग आहे. जिथे आपण आराम करतो आणि संपूर्ण दिवसाचा थकवा दूर करतो. बेडरूममध्ये आपण आपल्या कुटुंबासोबत आयुष्यातील आरामदायी क्षण घालवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की बेडरूममध्ये काही गोष्टी ठेवू नयेत. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते आणि त्याचा तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कधीच ठेवल्या नाही पाहिजेत.
देव-देवतांच्या मूर्ती: वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये देव-देवतांच्या मूर्ती ठेवणे योग्य मानले जात नाही. बेडरुम हे विश्रांतीचे ठिकाण आहे. देवाच्या मूर्ती फक्त पूजास्थळी ठेवाव्यात. जर तुम्ही देवाच्या मूर्ती बेडरुममध्ये ठेवल्या तर तुमच्या मानसिक शांतीवर परिणाम होऊ शकतो.
धार्मिक पुस्तके: धार्मिक पुस्तके देखील बेडरूममध्ये कधीही ठेवू नयेत कारण असे करणे शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार, गीता, कुराण, बायबल सारखी धार्मिक पुस्तके पूजास्थळी किंवा मंदिरात आदराने ठेवावीत. ती बेडरूममध्ये ठेवणे त्यांचा अपमान मानले जाते.
पूर्वजांचे फोटो: काही लोक त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावतात जे आता या जगात नाहीत. मृतांचे फोटो बेडरूममध्ये लावू नयेत. मृत व्यक्तीचा फोटो पूजास्थळासारख्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून घराचे वातावरण सकारात्मक राहील.
झाडू: वास्तुशास्त्रानुसार, झाडू बेडरूममध्ये ठेवू नये. झाडू स्वच्छतेशी संबंधित आहे परंतु तो घराच्या मुख्य जागेच्या बाहेर ठेवावा. जर तुम्ही बेडरूममध्ये झाडू ठेवला तर तुमच्या घरात पैशाची चणचण भासू शकते. म्हणून, तो बेडरूमच्या बाहेर ठेवा.
कात्री किंवा तीक्ष्ण वस्तू: वास्तुशास्त्रानुसार, कात्री किंवा इतर तीक्ष्ण वस्तू बेडरूममध्ये ठेवू नयेत, त्या नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, ज्यामुळे घरात तणाव आणि भांडणे होऊ शकतात. म्हणून या गोष्टी बेडरूममध्ये न ठेवता इतर ठिकाणी ठेवणे चांगले.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
