Chanakya Niti | मुलांच्या या सवयींकडे दुर्लक्ष करु नये, आचार्य चाणक्य यांचा पालकांना सल्ला

Chanakya Niti | मुलांच्या या सवयींकडे दुर्लक्ष करु नये, आचार्य चाणक्य यांचा पालकांना सल्ला
Acharya-Chanakya

मुलांची पहिली शाळा त्यांच्या घरापासूनच सुरु होते आणि त्यांचे पालक त्यांचे पहिले शिक्षक असतात. मुलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या निर्मितीचा पाया पालकांची मूल्ये बनतात. म्हणूनच पालकांनी लहानपणापासूनच मुलांच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट सवयीवर लक्ष ठेवले पाहिजे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 13, 2021 | 7:48 AM

मुंबई : असं म्हणतात की मुलांची पहिली शाळा त्यांच्या घरापासूनच सुरु होते आणि त्यांचे पालक त्यांचे पहिले शिक्षक असतात. मुलाच्या व्यक्तिमत्त्वाच्या निर्मितीचा पाया पालकांची मूल्ये बनतात. म्हणूनच पालकांनी लहानपणापासूनच मुलांच्या प्रत्येक चांगल्या आणि वाईट सवयीवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगल्या सवयींना प्रोत्साहन द्या आणि वाईट सवयी मोडून काढा (Acharya Chanakya Advise Parents To Do Not Ignore These Two Habits Of Children In Chanakya niti).

परंतु बर्‍याच वेळा मुलं लहान असल्याने पालक त्यांच्या काही सवयींकडे दुर्लक्ष करतात, या सवयी मुलांसाठीच नव्हे तर त्यांच्या पालकांसाठीही समस्या निर्माण करतात. आचार्य चाणक्य यांनीही चाणक्य नीतिमध्ये अशा दोन सवयी नमूद केल्या आहेत, त्याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. त्या सवयींविषयी जाणून घ्या.

खोटे बोलण्याची सवय

चाणक्य नीतिच्या मते, बर्‍याच वेळा मुले आई-वडिलांशी खोटे बोलतात आणि पालक मुलांची बदमाशी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलाला प्रेमाने समजावून सांगावे आणि खोटे बोलण्यास मनाई करावी. जर ही सवय वेळेत सुधारली गेली नाही तर नंतर ती मुलाचे भविष्य खराब करु शकते आणि त्याला चुकीच्या मार्गावर नेऊ शकते.

हट्ट करणे

काही मुले हट्टी असतात आणि त्यांच्या पालकांचे ऐकत नाहीत. अशा मुलांना अनियंत्रित होण्याची सवय होते आणि त्यांना काय बरोबर आणि काय चुकीचे यातला फरक समजत नाही. म्हणूनच मुलांची ही सवय बालपणातच सुधारली पाहिजे. यासाठी, प्रेमासह योग्य आणि अयोग्य यामधील फरक मुलांना समजावून सांगा.

महापुरुषांच्या कथा सांगा

चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार मुलांना लहानपणापासूनच थोर पुरुषांच्या कथा सांगायला हव्यात, यामुळे मुलांना प्रेरणा मिळते आणि चांगल्या विचारांची भरभराट होते. अशा परिस्थितीत मुलांच्या मनात त्यांच्यासारखी होण्याची इच्छा विकसित होते. जर महान पुरुष मुलांचे आदर्श बनतात तर त्यांचे भविष्यही चांगले होईल.

प्रेमाने समजावून सांगा

आचार्य चाणक्य यांचा असा विश्वास होता की मुलांना नेहमीच प्रेमाने शिकवावे. कारण मारहाणीमुळे मुले हट्टी होतात. पाच वर्षांनंतर, आपण मुलांसोबत थोडे कठोर होऊ शकता. पण मुलांवर हात उगारु नये.

Acharya Chanakya Advise Parents To Do Not Ignore These Two Habits Of Children In Chanakya niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले तुमचं जीवन बदलू शकतात…

Chanakya Niti | या 4 जणांपुढे कधीही पैशांबाबत बोलू नये, अन्यथा आपण मोठ्या संकटात पडू शकता

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें