Chanakya Niti | अशा स्वभावाच्या व्यक्तीला कुणीही हरवू शकत नाही….

आचार्य चाणक्य यांचे शब्द कठोर आहेत. परंतु ते आपल्या जीवनाची योग्य दिशा दाखवतात (Acharya Chanakya).

Chanakya Niti | अशा स्वभावाच्या व्यक्तीला कुणीही हरवू शकत नाही....
आचार्य चाणक्य
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:44 PM

मुंबई : आचार्य चाणक्य यांचे शब्द कठोर आहेत. परंतु ते आपल्या जीवनाची योग्य दिशा दाखवतात (Acharya Chanakya). त्यांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या जीवनातील सर्वोच्च यश देखील प्राप्त करु शकतो. आपण आपल्या आयुष्यात चाणक्य यांच्या शब्दांकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. पण, जर आपण त्या विचारांकडे लक्ष दिले तर आपले आयुष्य एका क्षणात बदलू शकते (Acharya Chanakya Said A Person Of This Nature Can Not Be Defeated In Chanakya Niti).

त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतात. आज आपण आचार्य चाणक्य यांच्या त्याच गोष्टींचे विश्लेषण करणार आहोत. आचार्य चाणक्य म्हणतात, ‘स्वतःच्या चुकांसाठी स्वतःशीच संघर्ष करणार्‍याला कोणीही हरवू शकत नाही.’

स्वतःशी लढणाऱ्या व्यक्तीला हरवणे कठीण असते –

चाणक्य सांगतात की, ‘जी व्यक्ती स्वतःच्या चुका दुसऱ्याच्या आधी बघतो आणि त्याला सामोरे जातो त्या व्यक्तीला जीवनात कुणीही हरवू शकत नाही.’ पण, स्वत:च्या चुका एखादी व्यक्ती स्वीकार करणे आणि स्वत:शी संघर्ष करणे हे अत्यंत कठीण असतं, हे खरं आहे. याप्रकारचा शौर्य खूप कमी लोक दाखवू शकतात. पण, जे लोक ही हिम्मत दाखवतात त्यांचा विजय निश्चित असतो.

वास्तविक जीवनात आपण बर्‍याचदा चुका करतो, पण त्या स्वीकारत नाही. आपण आपल्या चुका मान्य केल्या नाही तर त्याला सामोरे जाणेही आपल्यासाठी कठीण होईल. पण, काही लोक असेही आहेत जे चुका करतात आणि इतरांनी सांगण्यापूर्वीच ते स्वत:च्या चुकांचा सामना करतात. अशा लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न डोकावत असतात. अशी व्यक्ती त्या चुकांचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न करतात. परंतु, असे लोक फारच दुर्मिळ आढळतात.

असे लोक आपल्या चुकांच्या मागील कारण शोधतात

त्यांची चूक कशी झाली असेल आणि चुकण्यामागील कारण काय होते?, या प्रश्नांची उत्तरं हे लोक शोधत असतात. या लोकांना हरवणे अत्यंत कठीण असते. त्यामुळेच आचार्य चाणक्य म्हणतात ‘स्वतःच्या चुकांसाठी स्वतःशीच संघर्ष करणार्‍याला कोणीही हरवू शकत नाही.’

Acharya Chanakya Said A Person Of This Nature Can Not Be Defeated In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : व्यक्तिच्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत या 4 गोष्टी, लक्षात असुद्या अन्यथा…

Chanakya Niti | जर तुम्ही ‘या’ तीन गोष्टी मानत असाल तर तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही

Chanakya Niti | व्यक्तिमत्व कितीही मोठं असू दे, जर तुमच्यात हे अवगुण असतील तर सर्व निरर्थक…

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.