AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | उत्कृष्ट करिअर हवं असेल तर आचार्य चाणाक्य यांचे हे 4 गुरुमंत्र लक्षात ठेवा

जगात अशी कुठली व्यक्ती आहे ज्याला यश मिळवायचे नाहीये? परंतु प्रत्येकाला आपल्या करिअरमध्ये मोठे स्थान मिळालेच पाहिजे हे आवश्यक नाही. कधीकधी लोक, कुशल असूनही, त्यांच्या पात्रतेच्या पातळीवर पोहोचत नाहीत. पण या अपयशासाठी प्रत्येकवेळी नशिबाला दोष देणे योग्य नाही.

Chanakya Niti | उत्कृष्ट करिअर हवं असेल तर आचार्य चाणाक्य यांचे हे 4 गुरुमंत्र लक्षात ठेवा
chanakya Niti
| Edited By: | Updated on: Sep 11, 2021 | 7:20 AM
Share

मुंबई : जगात अशी कुठली व्यक्ती आहे ज्याला यश मिळवायचे नाहीये? परंतु प्रत्येकाला आपल्या करिअरमध्ये मोठे स्थान मिळालेच पाहिजे हे आवश्यक नाही. कधीकधी लोक, कुशल असूनही, त्यांच्या पात्रतेच्या पातळीवर पोहोचत नाहीत. पण या अपयशासाठी प्रत्येकवेळी नशिबाला दोष देणे योग्य नाही.

आचार्य चाणक्यांचा असा विश्वास होता की जर एखाद्याला आयुष्यात खरोखरच प्रगती करायची असेल तर कठोर परिश्रम आणि समर्पणाव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीमध्ये 4 गुण असणे फार महत्वाचे आहे. त्या गुणांबद्दल येथे जाणून घ्या आणि जर तुमच्यामध्ये हे गुण नसतील तर त्यांना सतत सरावाने विकसित करण्याचा प्रयत्न करा.

1. शिस्तबद्ध असणे

तुम्ही कितीही कुशल असाल पण तुम्ही तुमच्या कामाप्रती प्रामाणिक आणि शिस्तबद्ध नसलात, तर कोणीही तुम्हाला यशस्वी करु शकत नाही, असं मत आचार्यांचं होतं. शिस्तीशिवाय कोणतेही काम वेळेवर पूर्ण होत नाही. म्हणून, जीवनात तुम्ही तुमच्या नोकरी-व्यवसायात तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही पूर्ण प्रामाणिकपणे गुंतून राहा आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची सवय लावा.

2. जोखीम घेण्याचे धैर्य

यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जोखीम घेऊन काही काम करावे लागतील. यासाठी स्वतःला तयार करा. पण, कोणतीही जोखीम घेण्यापूर्वी त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करा आणि विचार करा की जर तुम्हाला यश मिळाले नाही तर तुम्ही त्याचे नुकसान भरुन काढू शकाल. या परिस्थिती समजून घेतल्यानंतर कोणतेही काम पूर्ण तयारी आणि सकारात्मकतेने करा. योग्य वेळी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे व्यक्तीला मोठा फायदा होतो.

3. व्यवहार कुशलता

तुम्ही व्यापारी असाल किंवा नोकरदार व्यक्ती असाल तुम्ही जर चतुर नसलात तर तुम्ही चांगले करु शकत नाही. व्यवहार कुशल लोक प्रत्येकाला त्यांच्या वागणुकीने प्रभावित करतात आणि प्रत्येकाचे आवडते बनतात. अशा प्रकारे ते वेगाने प्रगती करतात.

4. सर्वांना बरोबर घेऊन चलण्याची भावना

जर तुमच्यामध्ये प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची भावना असेल तर तुम्ही वेगाने यशस्वी होऊ शकता कारण कोणीही एकटे काहीही साध्य करु शकत नाही. म्हणून एक मजबूत टीम तयार करा आणि प्रत्येकाच्या सहकार्याने काम करा. जर तुम्ही हे कौशल्य शिकलात तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | या परिस्थितींमध्ये आई-वडील, पती-पत्नी आणि मुलंही शत्रू बनतात, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | वाईट काळात या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, आचार्य चाणक्य काय सांगतात जाणून घ्या

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.