AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आनंदी आयुष्य हवंय, तर आचार्य चाणक्य यांच्या या धोरणांचं पालन करा

आचार्यांनी आपल्या नीतिशास्त्राद्वारे जीवनासाठी तसेच उद्योगांसाठी अशी अनेक धोरणे सांगितली आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आचार्य चाणक्यांची धोरणे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची वेळ नाही, तर ही धोरणे त्यांना यशाच्या शिखरावर नेतील.

Chanakya Niti | आनंदी आयुष्य हवंय, तर आचार्य चाणक्य यांच्या या धोरणांचं पालन करा
स्वतःचे त्रास स्वत: पर्यंत ठेवा - चाणक्य नीतीनुसार, तुमच्या आयुष्यातील त्रास इतरांना शेअर करणे टाळले पाहिजे. तुमची समस्या जाणून घेतल्यानंतर लोक तुमची थट्टा करतील. तुम्हाला त्यांच्या कडून कोणतीच मदत होणार नाही.
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Aug 31, 2021 | 7:52 AM
Share

मुंबई : ज्यांनी चंद्रगुप्त मौर्याला भारताचा सम्राट बनवले ते दुसरे कोणी नसून आचार्य चाणक्य होते. आचार्य चाणक्य यांची धोरणे नेहमीच तर्कसंगत आणि बरीच लोकप्रिय आहेत. चाणक्य एक महान इतिहासकार, महान राजकारणी आणि महान मुत्सद्दी मानले जातात.

आचार्यांनी आपल्या नीतिशास्त्राद्वारे जीवनासाठी तसेच उद्योगांसाठी अशी अनेक धोरणे सांगितली आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आचार्य चाणक्यांची धोरणे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची वेळ नाही, तर ही धोरणे त्यांना यशाच्या शिखरावर नेतील.

आज आपण आचार्य चाणक्याच्या धोरणाबद्दल बोलणार आहोत. चाणक्य यांनी सांगितले आहे की, ज्याच्याशी तुम्ही लग्न कराल, तुम्ही त्याच्यातील काही विशेष गुणांची तपासणी केली पाहिजे जेणेकरून तुमचे जीवन सुखी होईल.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या धोरणाद्वारे काही मुख्य मुद्दे सांगितले आहेत –

आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, केवळ चेहऱ्याचे सौंदर्य हे सर्व काही नाही. जर तुम्ही चेहरा बघून लग्न केले तर ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. जर तुम्ही लग्न केले तर तुम्ही तिच्या मनाचे सौंदर्य आणि गुण बघितले पाहिजेत, बाह्य सौंदर्य नाही.

स्त्रीच्या स्वरुपापेक्षा अधिक महत्वाचे तिचे संस्कार आहेत. कारण, सौंदर्य काही काळाच असते, परंतु संस्काराद्वारे व्यक्ती केवळ त्याच्याच नव्हे तर त्याच्या वंशजांनाही गुणांनी भरते. सुसंस्कृत स्त्री घराला स्वर्ग बनवते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात सांगितले आहे की तुमचा जोडीदार किती धैर्यवान आहे या गुणवत्तेची निश्चितपणे चाचणी करा. कारण, जी स्त्री आपत्कालीन परिस्थितीत तिच्या पतीसोबत उभी राहते, तिचे वैवाहिक आयुष्य आनंदी राहते.

एखाद्या व्यक्तीचा राग हा त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो, असे म्हणतात. ज्यांना त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, ते स्वतःच त्यांचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त करतात. जर स्त्री खूप रागीट असेल तर कौटुंबिक जीवन पूर्णपणे उध्वस्त होते. शक्तीचे भांडार असे म्हटले जाणारी स्त्री रागावली तर कुटुंब उद्ध्वस्त होते. याचे एक उदाहरण शिव पुराणातही सापडते, ज्यात असे सांगितले आहे की जेव्हा पार्वतीला राग आला तेव्हा तिने भगवान शंकराचा अंत केला. त्याचवेळी महाभारतात अंबाच्या रागामुळे महायुद्ध झाले होते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आजचे काम उद्यावर ढकलले, आळस केल्यास ही गोष्ट कधीच साध्य होणार नाही; जाणून घ्या चाणक्य नीति काय सांगते

Chanakya Niti | आर्थिक संकटाचे संकेत देतात या 3 गोष्टी, आधीच सावध व्हा

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?