महिला लग्नापूर्वी…, अनिरुद्धाचार्य यांचं पुन्हा वादग्रस्त विधान, प्रकरण थेट कोर्टात
गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धाचार्य हे आपल्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यांचे काही कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला असून प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आहे.

धार्मिक व्यासपीठ हे कायम लोकांच्या अस्थेचा विषय असतं. लोक तिथे केवळ प्रवचन, किर्तन ऐकण्यासाठी नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये एक गोंधळ सुरू असतो, मनात सुरू असलेला गोंधळ दूर करून मनशांतीसाठी अशा ठिकाणी जात असतात, आपल्याला जीवन जगण्याची एक नवी दिशा मिळू शकते ही अपेक्षा भक्तांमध्ये असते. अशा धार्मिक व्यासपीठावरून जो व्यक्ती बोलतो, त्याच्या प्रत्येक शब्दाचा परिणाम हा तिथे आलेल्या भक्तांवर होत असतो. जेव्हा एखादे प्रवचनकार बोलतात किंवा साधू संत बोलतात तेव्हा ते जे बोलतात ते सत्य बोलतात असं समजून तिथे येणारे भक्त त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र अशा एखाद्या मोठ्या मंचावर असं वक्तव्य केलं जातं, ज्यामुळे समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो तेव्हा त्याचा अनेकदा समाजाकडून विरोध होतो.
गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धाचार्य हे आपल्या वक्तव्यांमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यांचे काही कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ते बोलताना महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे, त्यांच्याविरोधात काही ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आली आहे. अनिरुद्धाचार्य यांची ही विधानं म्हणजे आमचा अपमान असल्याचा आरोप अनेक महिलांकडून करण्यात आला आहे, आता हे प्रकरण एवढं वाढलं की ते थेट न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. मथुरा कोर्टानं ही याचिका स्वीकारली देखील आहे. हे सर्व प्रकरण त्यांच्या एका वक्तव्याशी संबंधित नाहीये तर त्यांच्यावर इतरही काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
त्यांचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्यांनी महिलांबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. महिलांचे लग्नापूर्वी अनेक ठिकाणी प्रेमसंबंध असतात आणि मग त्या लग्नाबद्दल विचार करतात अशा अशयाचं विधान त्यांनी या व्हिडीओमध्ये केलं आहे, तसेच त्यांनी आणखी एका आपल्या कथित व्हिडीओमध्ये मुलींचं लग्न 14 व्य वर्षीच करण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे आता अनिरुद्धाचार्य हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
