AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashadhi Ekadashi: कशी असणार विठ्ठलाची महापूजा?; यंदा कोणावर काय जबाबदारी?

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. शेकडो मैलांवरून आलेले वारकरी आता विठुरायाचे दर्शन घेत आहे. भक्तांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थानाकडून 24 तास विठुरायाचे दर्शन सुरु ठेवले आहे. यंदाची आषाढी एकादशीची महापूजा (Pandharpur Mahapuja) संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळे पण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्वाची असते. […]

Ashadhi Ekadashi: कशी असणार विठ्ठलाची महापूजा?; यंदा कोणावर काय जबाबदारी?
| Updated on: Jul 10, 2022 | 5:30 AM
Share

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आहे. शेकडो मैलांवरून आलेले वारकरी आता विठुरायाचे दर्शन घेत आहे. भक्तांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थानाकडून 24 तास विठुरायाचे दर्शन सुरु ठेवले आहे. यंदाची आषाढी एकादशीची महापूजा (Pandharpur Mahapuja) संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळे पण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्वाची असते. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात. यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde in pandharpur) यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे. याशिवाय वारीमध्ये आलेल्या एका जोडप्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास ,सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी ही एकादशीची महापूजा संपन्न करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी पुर्ण झाली आहे.

चार प्रमुख पुजारी पैकी संदीप कुलकर्णी यांच्याकडे प्रमुख म्हणजे मंत्रोच्चार करण्याचे काम असते. यामुळे त्या दिवशी संपूर्ण वातावरण मंगलमय झालेले असते. तर या मंत्रोच्चार प्रमाणे उपचार करण्याची जबाबदारी सुनील गुरव यांच्याकडे असते. देवाला स्नान घालणे गंध लावणे, पोशाख करणे, मुकुट डोक्यावर ठेवणे इत्यादींचा यामध्ये समावेश असतो. महापूजा करते वेळी मंत्रोच्चार करणे जसे महत्वाचे आहे. अगदी त्याच पद्धतीने पंढरपुरात देवा समोर यावेळी अभंग म्हणण्याची परंपरा आहे. यामधून वारकऱ्यांची देवाप्रती असलेली भावना मांडली जाते. ती जबाबदारी केशव नामदास पार पाडतात. अशा मंगलमय वातावरणात ही महापूजा संपन्न होते.

पोलीस प्रशासनही सज्ज

आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांची सुरक्षा ही महत्त्वाची मानल्या जाते. या पार्श्वभूमीवर पंढरपूचे पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. याबद्दल पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम (Viram Kadam)  यांनी TV9 मराठीला माहिती दिली. वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पोलीस बंदोबस्त आलेला आहे. यामध्ये 250 पोलीस अधिकारी आणि 5 हजार पोलीस अंमलदार होमगार्ड पाचारण करण्यात आले आहे. यामध्ये मंदिर परिसर, नगर प्रदक्षिणा, वाळवंट आणि इतर महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. चोरीच्या घटनांना आला घालण्यासाठी 154 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.