Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा शुभारंभ कधी? कलश स्थापनेचा विधी काय?

Chaitra Navratri 2021 | चैत्र नवरात्रीचा शुभारंभ कधी? कलश स्थापनेचा विधी काय?
Chaitra Navratri 2021

हिंदू धर्मात नवरात्री हा उत्सव वर्षात चारवेळा साजरा केला जातो. चैत्र आणि शारदीय नवरात्रीसोबतच (Chaitra Navratri 2021) आणखी दोन नवरात्री असतात.

Nupur Chilkulwar

|

Feb 22, 2021 | 3:32 PM

मुंबई : हिंदू धर्मात नवरात्री हा उत्सव वर्षात चारवेळा साजरा केला जातो. चैत्र आणि शारदीय नवरात्रीसोबतच (Chaitra Navratri 2021) आणखी दोन नवरात्री असतात. त्या म्हणजे माघ नवरात्री आणि आषाढ नवरात्री. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाच्या 9 वेगवेगळ्या स्वरुपांची आराधना केली जाते. माघ नवरात्री आता समाप्त होणार आहे आणि आता चैत्र नवरात्रीला सुरुवात होईल (Chaitra Navratri 2021).

नवरात्रीचा हा उत्सव अनेक कारणांनी विशेष मानला जातो. धार्मिकदृष्ट्या याचं मोठं महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार या वर्षी 2021 मध्ये चैत्र नवरात्रीचा शुभारंभ 13 एप्रिलपासून होईल आणि 22 एप्रिलपर्यंत ही नवरात्री असेल.

कलश स्थापना कुठल्या दिवशी?

चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 13 एप्रिलला कलश स्थापना केली जाईल. नवरात्रीमध्ये कलश स्थापनेला विशेष महत्त्व असतं. विधिपूर्वक कलश स्थापना केल्याने तुम्हाला याचा लाभ मिळेल.

महानिशा पूजा

नवरात्रीमध्ये महानिशा पूजा सप्तमी युक्त अष्टमी किंवा मध्य रात्रीला निशीथ व्यापिनी अष्टमीला केली जाते. यावर्षी चैत्र नवरात्रीमध्ये महानिशा पूजा 20 एप्रिलला केली जाईल.

चैत्र नवरात्री पूजा विधी

>> चैत्र नवरात्री प्रतिप्रदेच्या तिथीला पहाटे अंघोळ करुन आगमन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, अक्षता-पुष्प, धूप-दिवा, नैवेद्य-तांबूल, नमस्कार-पुष्पांजली आणि प्रार्थना यांसारख्या उपायांनी पुजा करावी.

>> लकड्याच्या ठोकळ्यावर गेरुने नऊ देवींच्या आकृत्या बनवाव्या किंवा सिंहारुढ़ दुर्गा देवीचं चित्र या ठोकळ्याजवळ ठेवावे.

>> पिवळी माती टाकून एक फांदी आणि कलावा लपेटून त्याला गणेशाच्या स्वरुपात कलशावर विराजमान करावं.

>> घटाजवळ गहू किंवा जवचं भांड ठेवून वरुण पूजा करावी आणि भगवतीचं आवाहन करावं (Chaitra Navratri 2021)

गुप्त नवरात्री समाप्त

21 फेब्रुवारीला रविवारी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमी होती. यादिवशी गुप्त नवरात्री समाप्त झाली. तंत्र-मंत्र साधनेसाठी गुप्त नवरात्रीला उत्तम मानलं जातं. गुप्त नवरात्रीमध्ये माँ काली, तारा देवी, त्रिपुर सुंदरी, भुवनेश्वरी, माता चित्रमस्ता, त्रिपुर भारवी, माँ धूम्रवती, माता बगलामुखी, मातंगी, कमला देवीची पूजा केली जाते. यादरम्यान स्वच्छ मनाने भक्ती भावाने आणि विधीवत जी व्यक्ती देवीचं पूजन करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे.

Chaitra Navratri 2021

संबंधित बातम्या :

Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात, घटस्थापना मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या!

स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे शिवाचे ‘अर्धनारीश्वर’ रूप, वाचा भृंगीची कथा…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें