Chanakya Neeti : वडिलांच्या या 4 सवयी मुलांचं आयुष्य बरबाद करतात, चाणक्य काय सांगतात?
चाणक्य म्हणतात वडिलांच्या अशा काही सवयी असतात, ज्यामुळे मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याचं आयुष्य बरबाद होतं, चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या सवयी? आणि आर्य चाणक्य यांनी काय म्हटलं आहे त्याबद्दल.

आर्य चाणक्य यांनी शेकडो वर्षांपूर्वी त्यांच्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या आजही आपल्यासाठी मार्गदर्शनाचं काम करतात. चाणक्य यांनी ज्या नीती सांगितल्या आहेत, जे विचार मांडले आहेत, त्यामधून तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्येचं उत्तर मिळू शकतं. चाणक्य म्हणतात वडिलांच्या अशा काही सवयी असतात, ज्यामुळे मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, त्याचं आयुष्य बरबाद होतं, चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या आहेत त्या सवयी? आणि आर्य चाणक्य यांनी काय म्हटलं आहे त्याबद्दल.
मुलांचा गरजेपेक्षा जास्त लाड करू नका – चाणक्य म्हणतात मुलांच्या वडिलांनी कधीही एका मर्यादेपर्यंतच मुलांचा लाड केला पाहिजे, ही मर्यादा ओलांडता कामा नये, जर तुम्ही तुमच्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली तर तो त्याच्या आयुष्यात हट्टी बनू शकतो. जे लोक हट्टी असतात आणि आपलंच खरं असं मानत असतात ते लोक कधीच दुसऱ्याचा सल्ला ऐकत नाहीत, त्यामुळे अशा मुलांना त्यांच्या पुढील आयुष्यात अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मुलांचे लाड एका मर्यादेपर्यंतच करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
मुलांच्या निर्णयामध्ये दखल देऊ नका – आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा मुलगा मोठा होता, तेव्हा तो त्याचे निर्णय स्वत: घ्यायला सुरुवात करतो. त्यातून त्याला जगामध्ये कसं वागावं याचा अनुभव प्राप्त होतो. मात्र तुम्ही जर तुमच्या मुलाने घेतलेल्या निर्णयांमध्ये वारंवार दखल देत असाल तर हे तुमच्या मुलांसाठी योग्य नाही, कारण ते त्याची आत्मनिर्भरतेला कमी करते. त्याचा आत्मविश्वास कमी होतो, त्यानंतर छोटे-छोटे निर्णय घेताना देखील त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
मुलांना चांगले संस्कार द्या – चाणक्य म्हणतात अनेक आई -वडील आपल्या मुला-मुलींना पैशांचं तर महत्त्व समजून सांगतात. मात्र ते मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी कमी पडतात, ज्या मुलांवर चांगले संस्कार झाले आहेत, अशी मुलं जगाच्या पाठीवर कुठेही आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करतात. मात्र जे मुलं संस्कारहीन असतात त्यांना मात्र चुकीची संगत लागू शकते. ते वाईट मार्गावर जाऊ शकतात.
मुलांचं जास्त कौतुक करू नका – चाणक्य म्हणतात तुम्ही तुमच्या मुलांचं जास्त कौतुक करू नका, तुम्ही जर तुमच्या मुलांचं जास्त कौतुक करत असाल तर त्यामुळे ते बिघडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शक्य असेल तिथेच आई -वडिलांनी आपल्या मुला -मुलींचं कौतुक करावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
