Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात शांती पाहिजे? मग चाणक्यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी लक्षात ठेवा
चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ देखील होते, एखादी व्यक्ती आपलं वैवाहिक जीवन सुखी कसं करू शकते? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत.

आर्य चाणक्य हे भारताच्या इतिहासातील एक महान विचारवंत आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये ज्या नीती सांगितल्या आहेत, त्या केवळ फक्त राजकारण आणि प्रशासनासाठीच उपयोगाच्या नाहीत, तर व्यक्तीच्या वैयक्तीक आयुष्यात देखील त्यांचं मोठं महत्त्व आहे. माणसानं आपलं जीवन कसं जगावं याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. हे सांगत असतानाच एका विवाहित पुरुष किंवा स्त्रीचं आयुष्य कसं असावं? सुखाचा संसार कसा करावा याबद्दल देखील चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.
प्रेम – चाणक्य म्हणतात जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी प्रेमानं जिंकता येऊ शकत नाही. लग्नानंतर पती -पत्नीला आपलं संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचं असतं, पती- पत्नी ही संसाराची दोन चाकं आहेत, त्यामुळे पती -पत्नीमध्ये प्रेम असावं. प्रेम हाच त्यांच्या नात्याचा पाया आहे, ज्यावर संसाराचा कळस चढवला जाऊ शकतो. जर पती पत्नीमध्ये प्रेम असेल तर संसार आनंदाचा होतो.
प्रामाणिकपणा – चाणक्य म्हणतात एकदा लग्न झालं की पती असो किंवा पत्नी दोघांनीही आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहिलं पाहिजे. जर दोन्हीपैकी एक जरी आपल्या नात्याबद्दल प्रामाणिक नसेल तर ते नातं फार काळ टिकत नाही. त्यामुळे संसारात आपल्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहावं.
अभिमान – चाणक्य म्हणतात कोणत्याही गोष्टीचा व्यर्थ अभिमान बाळगू नका, किंवा श्रेष्ठत्वाची भावना ठेवू नका, मी पती पेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा मी पत्नीपेक्षा श्रेष्ठ आहे, अशी भावना नसावी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
स्वार्थ – चाणक्य म्हणतात संसारामध्ये कोणतेही निर्णय स्वार्थापोटी घेऊ नका, आपल्या जोडीदाराचाही विचार करा, तरच तुमचा संसार आनंदाचा होईल, घरात सूख, समृद्धी येईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
