Chanakya Neeti : यशस्वी व्हायचंय? मग चाणक्य यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टींचा विचार कराच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांनासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही जीवनात मार्गदर्शक ठरतात. व्यक्तीनं काय करावं? कय करू नये? कुठे बोलावं? कुठे बोलू नये, कोणाला उपदेश द्यावा? कोणाला देऊ नये? पैशांची बचत कशी करावी? दान धर्म कसा आणि कुठे करावा? आदर्श पतीची लक्षणं काय आहेत? कुटुंब प्रमुखानं आपल्या कुटुंबाचा सांभाळ कसा करावा? आई -वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अशा पाच गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचं पालन केल्यास व्यक्ती नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो, आज त्याच गोष्टींबद्दल आपण माहिती घेणार आहेत.
वेळेचं नियोजन – चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात जर सर्वात काही महत्त्वाचं असेल तर ते म्हणजे वेळेचं नियोजन, प्रत्येक गोष्टी ही त्या-त्या वेळेतच व्हायला पाहिजे, वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीला शून्य किंमत उरते. म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये मुलांनी अभ्यासच केला पाहिजे, कारण मोठे झाल्यानंतर त्यांच्यावर जबाबदारीचं ओझ पडणार असतं, अशा स्थितीमध्ये ते अभ्यास करू शकणार नाहीत, जर त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेमध्ये वेळेचं महत्त्व ओळखून अभ्यास केला, उच्च शिक्षित बनले तर त्यांना जगामध्ये आदर-सन्मान मिळतो, ते रोजगाराच्या योग्य बनतात. मात्र हातात वेळ असताना त्यांनी जर अभ्यास केला नाही तर वेळ निघून गेल्यानंतर त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतात, हे सूत्र संसारातल्या प्रत्येक गोष्टींबद्दल लागू होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
मित्र जोडा – चाणक्य म्हणतात आयुष्यात माणूस हा अजातक्षत्रू असावा ज्याला एक शत्रू असू नये, जर शत्रू असेल तर भविष्यात कधीना -कधी त्याच्यापासून तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही जिथे जाल तिथे मित्र जोडा. ओळखी वाढवा, कोण व्यक्ती कधी उपोयगी पडू शकतो हे कोणालाही सांगता येत नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
पैशांचा योग्य वापर – चाणक्य म्हणतात या जगात पैसा हा सर्वात महत्त्वाचा आहे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुमच्यावर कोणतंही संकट येऊ शकत नाही. त्यामुळे पैशांची बचत करा, संकट काळासाठी पैसा वाचवून ठेवा. जिथे खरच गरज असेल तिथेच पैसा खर्च करा तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल.
संयम – संयम हे माणसाकडे असलेलं सर्वात मोठं शस्त्र आहे, असं चाणक्य म्हणतात, प्रत्येक गोष्टीचा एक योग्य काळ असतो, त्यामुळे संयम ठेवून तुम्ही प्रयत्न करा, तुमची इच्छा नकी पूर्ण होते, असं चाणक्य यांनी सांगितलेलं आहे.
योग्य निर्णय – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हाही कोणता निर्णय घेणार असाल तर तो थोडा उशिरा घ्या पण योग्य घ्या, तुमच्या एका निर्णयावर तुमचं भविष्य अवलंबून असू शकतं, त्यामुळे निर्णय घेतला घाई करू नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
