Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते ‘या’ 4 सवयी आत्ताच बदला, नाहीतर नुकसान नक्की

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते 'या' 4 सवयी आत्ताच बदला, नाहीतर नुकसान नक्की
chankaya niti

व्यक्तींमधील काही दोष चाणक्यनीती मध्ये मांडले होते. जर आपण त्या दोषांवर काम केले नाही तर भविष्यात आपले नुकसान नक्की होते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Jan 16, 2022 | 8:40 AM

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला. त्याच अनुभवांच्या जोरावर त्यांनी आपले अनुभव चाणक्या नीती (Chanakya Niti ) मधून सर्वांसमोर आणले. आचार्य केवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे धनी (Money) नव्हते, तर ते सर्व विषयांचे जाणकारही होते. त्यांनी व्यक्तींमधील काही दोष चाणक्यनीती मध्ये मांडले होते. जर आपण त्या दोषांवर काम केले नाही तर भविष्यात आपले नुकसान नक्की होते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

माणसाच्या सवयीमुळे त्याची ओळख होते. चांगल्या सवयी लावून तो लोकांसाठी प्रेरणा तर बनतोच शिवाय सन्मान आणि प्रसिद्धीही मिळवतो. त्याच वेळी, चुकीच्या सवयींमुळे, एखादी व्यक्ती स्वत:चे नुकसान करुन घेतो.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये अशा काही सवयी सांगितल्या आहेत, ज्या जर एखाद्या व्यक्तीला असतील तर त्या व्यक्तीच्या हातात पैसा टिकत नाही. तसेच घरामध्ये नकारात्मक वातावरण निर्माण होते.

देवाची आराधना
पूजेने आपले विचार शुद्ध होतात. यामुळे घरातील वातावरण शुद्ध होते. त्याच प्रमाणे पूजेत वापरले गेलेले मंत्र शरीरासाठी उत्तम असतात.
जे लोक पूजा करत नाहीत, त्यांच्या घरात आणि मनात नकारात्मकता वास करू लागते.

अस्वच्छता
देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते. जे लोक अस्वच्छ राहतात त्यांना देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. माणसाने भौतिक, शरीर आणि मनाची शुद्धता करणे गरजेचे असते. त्यामुळे घर आणि शरीराच्या स्वच्छतेची काळजी घ्या.

भांडण करणारे लोक
भांडखोर स्वभावाच्या लोकांवर देवी लक्ष्मी असंतुष्ट राहते, त्यांच्या घरात नेहमी भांडण आणि भांडणाचे वातावरण असते. अशा लोकांच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कधीच राहत नाही.

मोठ्यांचा अनादर
ज्या घरात वृद्धांचा अपमान होतो, जे लोक असहाय्य लोकांना त्रास देतात, त्यांच्यावर अनेक संकटे येतात. अशा घरात समस्यांचे चक्र फिरत राहते आणि सुखाचा वास राहत नाही. त्यामुळे आपल्या वडिलधाऱ्यांचा आणि मोठ्यांचा आदर करायला शिका.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धांवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसाधारण हित लक्षात घेऊन येथे सादर करण्यात आले आहे.)

संबंधीत बातम्या :

उद्या मंगळ करणार धनु राशीत प्रवेश, या 3 राशींना होणार धनलाभ!

Rashifal : पैशांचे व्यवहार करताना ‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज!

Chanakya Niti : तुमच्या जीवनामध्ये समस्या आहेत? मग आजच आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी फाॅलो करा आणि सुखी जीवन जगा!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें