AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात या चार गोष्टींपासून कायम दूर रहा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात, ज्यांच्यापासून माणसाने नेमही दूर रहावे.

Chanakya Niti : आयुष्यात  या चार गोष्टींपासून कायम दूर रहा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
cankyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 05, 2026 | 8:00 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील आपल्याला विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात कधी -कधी असे प्रसंग येतात, तीथे आपली खरी परीक्षा असते, मात्र तुम्ही जर अशा ठिकाणी तुम्ही संयम ठेवला तर तुम्ही आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती बनाल. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर जवळ केवळ संयम असून चालत नाही, तर त्यासाठी तुम्हाला काही पथ्य देखील पाळावे लागतात. तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर अशा काही गोष्टी येतील त्या तुम्हाला हव्या हव्याशा वाटू शकतात. मात्र त्यापासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

परस्त्री – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीचं लग्न झालं आहे, अशा व्यक्तीने आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. जर तुम्ही तुमचं लग्न झाल्यानंतर देखील एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होत असाल तर तुमच्या संसाराचं वाटोळं होण्यास फार काळ लागत नाही. तसेच यामुळे तुम्ही मोठ्या संकटात देखील सापडू शकतात, त्यामुळे लग्न झालेल्या माणसाने नेहमी आपल्या पत्नीशी एकनिष्ठ रहावं, तसेच महिलांनी देखील आपल्या पतीसोबत एकनिष्ठ रहावं.

भूतकाळ – चाणक्य म्हणतात अनेक जण असे असतात, की त्यांच्या भूतकाळात त्यांच्यासोबत काही कटू घटना घडलेल्या असतात. परंतु अशा आठवणीमधून तुम्ही वेळीच बाहेर पडणं गरजेचं असतं. माणसाने नेहमी भविष्याचा विचार करून वर्तमानात जगावं, भूतकाळामध्ये आपल्यासोबत काय घडलं आहे? याचा जास्त विचार करू नये, भूतकाळातील चांगल्या आठवणी नेहमी सोबत ठेवा, कटू आठवणी विसरून जा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

जुगार – चाणक्य म्हणता जुगार हे एक असं व्यसन आहे, जे तुम्हाला लागलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात इतर कोणत्याही व्यसनापासून मुक्ती मिळू शकते, परंतु ज्या व्यक्तीला जुगाराचं व्यसन लागलं आहे, तो व्यक्ती आपल्या संसाराचं पूर्णपणे वाटोळं करतो, त्यामुळे माणसाने कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

स्वार्थी मित्र – तसेच माणसाने आपल्या आयुष्यात स्वार्थी मित्रांपासून देखील दूर रहावं, असंही चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा