Chanakya Niti : असे पुरुष आपल्या मूर्खपणाने घर उद्ध्वस्त करतात, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
चाणक्य म्हणतात केवळ पत्नीच नाही तर पतीचे गुण आणि त्याच्या वागण्यावर देखील कुटुंबाचं सुख अवलंबून असतं. जगात असे काही पुरुष असतात जे अनेकदा अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यापासून दुरावलं जाऊ शकतं,

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आयुष्यात कसं जगावं, कोणत्या चुका टाळाव्यात? काय करावं? याबाबत मार्गदर्शन करतो. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये आदर्श पती-पत्नी कसे असावेत? याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीचा संसार हा मध्येच मोडतो, त्यासाठी अनेकदा पतीने केलेल्या चुका जबाबदार असतात. व्यक्ती आपल्या मूर्खपणामुळे काही चुका करतो, ज्यामुळे तो आपल्या पत्नीपासून दुरावला जातो आणि त्याच्या वाट्याला दु:ख येतं. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे ते?
चाणक्य म्हणतात केवळ पत्नीच नाही तर पतीचे गुण आणि त्याच्या वागण्यावर देखील कुटुंबाचं सुख अवलंबून असतं. जगात असे काही पुरुष असतात जे अनेकदा अशा चुका करतात ज्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यापासून दुरावलं जाऊ शकतं, मात्र हे लोक आपल्या पहिल्या चुकांमधून बोध देखील घेत नाहीत, त्याच -त्या चुका ते वारंवार करतात. मग एक वेळ अशी येते की, त्यांच्या संसाराचं वाटोळ होतं.
पत्नीचा अपमान – चाणक्य म्हणतात पत्नीचा अपमान हे घर तुटण्याचं सर्वात मोठं कारण असतं, जे पुरुष वारंवार आपल्या पत्नीचा अपमान करतात, त्या घरात कधीच शांती राहू शकत नाही.
चरित्र – चाणक्य म्हणतात ज्या पुरुषांचं लग्न झालं आहे, मात्र तरी देखील ते आपली पत्नी सोडून इतर महिलांसोबत प्रेमसंबंध ठेवत असतील तर असे पुरुष मूर्ख असतात, त्यांच्या या मूर्खपणामुळे घराचा नाश होतो.
काम न करणारे पुरुष – चाणक्य म्हणतात घर चालवण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, सर्वसामान्यपणे कमवण्याची जबाबदारी ही पुरुषांची असते, जर त्याने काम केलं नाही तर कुटुंबावर उपासमारीची वेळ येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
