Chanakya Niti : ‘हे’ तीन प्रकारचे लोक सोबत असतील तर भिकेलाच लागाल; कसे ओळखाल?

आचार्य चाणक्य यांनी अत्यंत फायद्याच्या आणि महत्वाच्या गोष्टी चाणक्य नितीमध्ये सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण जर फॉलो केल्यातर आपल्या आयुष्यातील अनेक समस्या या कायमच्या दूर होण्यास मदत होते. या गोष्टी नेमक्या कोणत्या त्याबद्दल जाणून घ्या.

Chanakya Niti : 'हे' तीन प्रकारचे लोक सोबत असतील तर भिकेलाच लागाल; कसे ओळखाल?
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 11:45 AM

आचार्य चाणक्य यांनी काही अत्यंत महत्वाच्या आणि फायद्याच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य हे भारतातील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. महान रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ, चंद्रगुप्त मौर्य नावाने देखील आचार्य चाणक्य यांना ओळखले जाते. चाणक्य नीतीमध्ये आचार्यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जर आपल्याला आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपण नेमक्या कोणत्या लोकांपासून चार हात दूर राहिला हवे, याबद्दल आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे. मुळात म्हणजे आपल्या आजूबाजुला असे काही लोक असतात, जे विंचू पेक्षा जास्त धोकादायक असतात. 

चतुर आणि लालची लोकांपासून राहा सावधान

बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजुला अनेक लोक असे असतात की, ते खूप जास्त लालची असतात. काहीही झाले तरीही त्यांना आपली प्रगती देखवत नाही. अशावेळी ते आपल्याला चतुरपणे अडकवण्याचा प्रयत्न करतात. हेच नाहीतर वाईट काळात चुकूनही अशा लोकांना मदत मागायला जाऊ नका. असे लोक तुम्ही त्यांच्यासोबत कितीही चांगले वागले तरीही तुमचे नुकसान करू शकतात. अशा लोकांना आपल्यापासून कधीही दूर ठवलेले अधिक चांगले.

स्वार्थी लोक अधिक घातक 

आचार्य चाणक्य म्हणतात की, कधीही लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेऊ नका. कारण ते तुम्हाला कधी फसवतील हे सांगता येत नाही. बरेच लोक आपल्या फायद्यासाठी काहीही करू शकतात आणि कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. बरेच लोक प्रत्येक गोष्टीमध्ये स्वत:चा फायदा बघतात. जर एखाद्या गोष्टीमध्ये त्यांचा फायदा होणार असेल तरच ते काम करतात. म्हणून स्वार्थी लोकांना आपल्या जवळही उभे करू नका. या लोकांची विश्वास ठेवण्याची मुळात लायकीच नसते. 

रागीट स्वभावाचे आणि पाठीमागे बोलणारे लोक 

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, कधीही आपण रागीट लोकांच्या जवळ जाऊ नये. माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा राग आहे. बऱ्याच वेळा रागात माणूस हा बरोबर काय आणि चूक काय हे विसरून जातो. मुळात म्हणजे एखादा व्यक्ती ज्यावेळी रागावतो, त्यावेळी तो स्वत:चे तर नुकसान करतोच शिवाय तो इतरांचेही नुकसान करू शकतो. अनेक लोकांना एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून बोलण्याची सवय असते, अशा लोकांपासूनही दूर राहा आणि त्यांना बोलणे टाळाच. 

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.