AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : यशस्वी लोकं या पाच कामांना कधीच विलंब करत नाहीत, चाणक्य यांनी सांगितला यशाचा मंत्र

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की जे लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतात, ते लोक कधीही पाच गोंष्टीमध्ये विलंब करत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : यशस्वी लोकं या पाच कामांना कधीच विलंब करत नाहीत, चाणक्य यांनी सांगितला यशाचा मंत्र
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 18, 2026 | 9:58 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगिता सिद्ध करतात. चाणक्य म्हणतात यश मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही. ज्या प्रमाणे स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी होतात, परंतु त्यातील एक जणच विजेता असतो. तो इतर खेळांडूपेक्षा काहीतरी वेगळं करतो, म्हणून तो ती स्पर्धा जिंकतो. त्याचप्रमाणे यशाचं देखील आहे. जेव्हा तुम्ही काहीतरी वेगळा विचार कराल तेव्हाच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल. नुसतं यश मिळून देखील चालत नाही तर ते तुम्हाला टिकवता देखील आलं पाहिजे असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि प्रयत्नात सातत्य या दोन गोष्टींची जशी आवश्यकता असते, तशीच आणखी एका गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे योग्य दिशेची तुमची दिशाच जर नक्की नसेल तर तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. जे यशस्वी लोक असतात, ते पाच गोष्टींमध्ये कधीच विलंब करत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

नियोजन – चाणक्य म्हणतात जे लोक त्यांच्या आयुष्यात यशस्वी असतात, असे लोक जेव्हा एखादी गोष्ट ठरवतात, तिचे नियोजन करतात त्यानंतर हे नियोजन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी कधीही विलंब करत नाहीत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याकडे त्यांचा ओढा असतो, ते कधीही कामात टाळाटाळ करत नाहीत, म्हणूनच अशी लोक यशस्वी होतात. ते केवळ यशस्वीच होत नाहीत, तर हे यश ते कायम टिकवून देखील ठेवतात.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाला पर्याय नाही, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्ट हे करावेच लागणार आहेत. यशस्वी लोक कधीही आळस करत नाहीत. ते आजचं काम कधीही उद्यावर ढकलत नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात यश प्राप्त होतं. त्यामुळे आजची कामं आजच केली पाहिजेत असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिकण्याची प्रक्रिया – चाणक्य म्हणतात जे लोक यशस्वी असतात, असे लोक सतत नवीन गोष्टी शिकत असतात, ते सतत आपल्याला अद्ययावत ठेवत असतात, ते कधीही शिकण्याचा कंटाळा करत नाहीत, ते नेहमी नवीन गोष्टी समजून घेतात, म्हणून ते जगाच्या पुढे चार पाऊलं असतात.

संधीचा लाभ – चाणक्य म्हणतात या जगात ज्याला संधीचा त्वरीत लाभ घेता येतो, तोच या जगात यशस्वी होतो. त्यामुळे जे लोक नेहमी नव्या संधीच्या शोधात असतात आणि संधी मिळताच त्वरीत त्या संधीचा लाभ घेतात असे लोक आपल्या आयुष्यात यशस्वी होतात.

पैशांचं नियोजन – चाणक्य म्हणतात ज्याला पैशांचं नियोजन जमलं तो आयुष्यात यशस्वी होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचं...
माझ्या राजीनाम्याची... MPSC पेपरफुटीच्या वादावर स्वतः अध्यक्षांचे मोठं विधान, काय म्हणाले?
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश