Chanakya Niti | यशस्वी व्हायचंय?, आर्य चाणक्य यांचे ‘हे’ 4 मंत्र लक्षात ठेवाच

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या कुशल नीतींच्या बळावरच एका साधारण मुलाला सम्राट बनवलं होतं. (chanakya teachings to get height of success and life management tips)

Chanakya Niti | यशस्वी व्हायचंय?, आर्य चाणक्य यांचे 'हे' 4 मंत्र लक्षात ठेवाच
Acharya Chanakya

नवी दिल्ली: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या कुशल नीतींच्या बळावरच एका साधारण मुलाला सम्राट बनवलं होतं. त्यांच्या जीवनाचे सर्व अनुभव त्यांनी चाणक्य नीती या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीतीत काय म्हटलं आहे, नक्की वाचा. (chanakya teachings to get height of success and life management tips)

आचार्य चाणक्य साधारण व्यक्ती नव्हते. ते एक महान कुटनीतीज्ज्ञ होते. राजनीती तज्ज्ञ होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास केला होता. त्यांना नीतीशास्त्र आणि अर्थशास्त्राचे जनकही म्हटलं जातं. चाणक्य यांनी त्यांच्या याच धोरणाच्या बळावर एका साधारण मुलाला सम्राट बनवलं. आपल्या जीवनाचे अनुभव त्यांनी चाणक्य नीतीच्या माध्यमातून सांगितले. आम्हीही तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी चाणक्य यांनी सांगितलेली यशाची गुरुकिल्ली सांगत आहोत.

चार गुरुमंत्र

>> आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेची किंमत करा, असं आचार्य चाणक्य सांगायचे. जे लोक वेळेचं महत्त्व जाणतात ते वर्तमानात जगतात आणि त्या क्षणाचा सदुपयोग करतात. वेळेचा काही भरवसा नसतो. आजची परिस्थिती चांगली असेल तर उद्याची परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे आजच्या प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा. नाही तर भविष्यात संकटाचा सामना करावा लागेल, असं चाणक्य सांगतात.

>> तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या जीभेवर तुमचा ताबा हवा. तुमची वाणी मधुर हवी. जे लोक घाणेरड्या भाषेचा उपयोग करतात ते लवकरच बरबाद होतात, असं चाणक्य सांगतात.

>> चुकीच्या सवई आणि चुकीची संगत नेहमीच आयुष्य बरबाद करते. त्यामुळे कोणी जर तुमच्याशी मैत्री करत असेल तर त्याचा काही ना काही स्वार्थ जरुर असतो हे लक्षात ठेवा. या गोष्टीचा विचार करूनच पुढे जा आणि चुकीची संगती तात्काळ सोडा.

>> मूर्ख व्यक्तीचा उपदेश ऐकावा लागल्याने ज्ञानी व्यक्तीही दु:खी होत असतो. त्यामुळे जे लोक सकारात्मक विचार करतात आणि त्यांचा व्यवहार सकारात्मक आहे, अशाच लोकांच्या संपर्कात राहा. नकारात्मक लोक तुम्हाला तुमच्या लक्ष्यापासून दूर ठेवू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे, असं चाणक्य म्हणतात. (chanakya teachings to get height of success and life management tips)

 

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या:

Chanakya Niti | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आचार्य चाणक्य यांचे हे 9 मंत्र नेहमी लक्षात ठेवा

Chanakya Niti | मांसाहारापेक्षा 10 पट, धान्यापेक्षा 38 पट अधिक शक्तीवर्धक, प्रत्येकाने दररोज सेवन करावा हा पदार्थ

Chanakya Niti | माणसाने ‘या’ तीन गोष्टींमध्ये समाधानी राहावं, अन्यथा जीवन जगणे कठीण होईल

(chanakya teachings to get height of success and life management tips)