Chanakya Niti : अशा पुरूषांसाठी महिला कोणत्याही थराला जाऊ शकतात..
चाणक्य यांनी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे. त्यांनी आपल्या नीति शास्त्रात महिलांची आवड, त्यांना काय आवडत नाही याबद्दलही बरंच काही लिहीलं आहे. महिलांना कोणते पुरुष आवडतात हे यावरून सहज समजते. असे पुरुष मिळवण्यासाठी महिला कोणत्याही थराला जातात.

जगातील सर्व गोष्टी समजणं सोप्पं आहे, पण एखाद्या महिलेच्या मनाचा तळ गाठणं, तिच्या मनात काय चाललंय हे समजून घेणं खूपच कठीण आहे, असं म्हटलं जातं. भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्र (चाणक्य नीती) मध्ये लिहिले आहे की स्त्रीला कोणीही समजू शकत नाही. भारतात महिलांना देवीचं रूप मानलं जातं. आचार्य चाणक्य म्हणतात की जीवन सुधारण्यासाठी अनेक सूचना, उपा. आहेत. एकीकडे स्त्रीच्या अस्मितेबद्दलच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी पुरूषांसाठी समजावून सांगितल्या गेल्या आहेत, तर दुसरीकडे पुरुषांसाठी स्त्रियांची काय विचारसरणी आहे तेही स्पष्ट केली आहे. आचार्य चाणक्य सांगतात की, जीवनाच्या आनंदाच्या क्षणी जोडीदार सर्वात महत्वाचा असतो. जर तुम्हाला एक खरा, चांगला जोडीदार मिळाला तर तुमचे जीवन आनंदी होते. पण आयुष्यात योग्य व्यक्ती, जोडीदार न मिळाल्यास शेवटच्या श्वासापर्यंत दुःखी राहावे लागते. महिला आणि मुलींना कोणत्या प्रकारच्या जोडीदाराची गरज आहे याचा उल्लेख आचार्य चाणक्य नीतिमध्ये केला आहे. महान आचार्य चाणक्य यांनी पुरुषांमधील असे काही गुण सांगितले आहेत, ज्यासाठी महिला जीव ओवाळून टाकतात. अशा पुरुषांना शोधण्यासाठी त्या दीर्घकाळ वाट पाहतात, एवढंच नव्हे तर त्या त्यांच्याकडे आकर्षित होतात. जर तुम्हीही एक पुरूष असाल आणि महिलांना कोणत्या गोष्टी आकर्षित करतात हे जाणून घ्यायचे असेल तर हे नक्की वाचा..
दुसऱ्या स्त्री कडे न पाहणारे पुरूष
हे एक अतिशय गुप्त वैशिष्ट्य आहे. जे प्रत्येक स्त्री किंवा मुलीला तिच्या जोडीदारामध्ये हवे असते. असे पुरुष महिलांच्या हृदयात सर्वाधिक जागा मिळवतात. जे पुरूष इतर महिलांकडे ढुंकूनही पाहत नाहीत, असे पुरूष स्त्रियॉ किंवा महिलांना खूप आवडतात. ते फक्त त्यांची जोडीदार असलेल्या स्त्रीकडेच लक्ष देतात.
आदर आणि कौतुक
आचार्य चाणक्य यांनी नीती चाणक्य नीतीमध्ये सांगितले आहे की, स्त्रियांना असे पुरुष त्यांचे जीवन साथीदार हवे असतात जे त्यांना पूर्ण सन्मान, आदर देतात. आणि त्यांचा स्वाभिमान दुखावत नाहीत. तसेच स्त्रियांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते. त्यामुळे पुरूषांनी नेहमी स्त्रियांची स्तुती करावी. जे पुरूष स्त्रियांचा आदर करत नाहीत, अशा पुरूषांना महिलांच्या मनात कधीच जागा मिळत नाही.
विश्वासघात करणारे पुरूष
लग्नानंतर महिला आपल्या पतीवर आंधळा विश्वास ठेवतात. जर तिचा विश्वास एकदा दुखावला गेला तर ती पुन्हा विश्वास ठेवू शकत नाही. म्हणूनच स्त्रिया नातेसंबंधात विश्वासघाती पुरुषांबद्दल कधीही समाधानी नसतात. त्यांच्या मनात प्रत्येक वेळी नवऱ्याबद्दल प्रश्न येत राहतात ज्यामुळे नात्यात शंका निर्माण होते. त्यामुळे पती-पत्नीने आपल्या नात्यात विश्वास राखला पाहिजे.