Diwali 2021 : दिवाळीला हे 10 सोपे उपाय करा, घरात सुख-समृद्धी येईल

लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस परिश्रम करतो, परंतु देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी श्रमाबरोबरच नशिबाचीही गरज असते आणि या सौभाग्याचा जागर करण्याचा सण म्हणजे दिवाळी. ज्यात प्रत्येकजण महालक्ष्मीची पूजा करतात आणि सर्व प्रकारचे उपाय करतात.

Diwali 2021 : दिवाळीला हे 10 सोपे उपाय करा, घरात सुख-समृद्धी येईल
दीपावलीला चतुर्ग्रही योग, या 5 राशींवर होणार माता लक्ष्मीची विशेष कृपा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Nupur Chilkulwar

Oct 23, 2021 | 2:08 PM

मुंबई : लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्ती रात्रंदिवस परिश्रम करतो, परंतु देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी श्रमाबरोबरच नशिबाचीही गरज असते आणि या सौभाग्याचा जागर करण्याचा सण म्हणजे दिवाळी. ज्यात प्रत्येकजण महालक्ष्मीची पूजा करतात आणि सर्व प्रकारचे उपाय करतात. जर तुम्ही या कोरोना काळात आर्थिक अडचणींमधून जात असाल आणि तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या दूर करुन आनंद आणि समृद्धी प्राप्त करायची असेल तर या दिवाळीत खालील सोपे आणि प्रभावी उपाय करायला विसरु नका

हे उपाय करा –

1.दिवाळीचा पवित्र सण साजरा करण्यासाठी, लोक फार पूर्वीपासून आपल्या घराची साफसफाई करण्यास सुरुवात करतात. परंतु जर तुम्ही हे कोणत्याही कारणामुळे करु शकत नसाल, तर तुम्ही किमान दिवाळीच्या दिवशी तुमचे घर आणि कामाची जागा पाण्याने धुवा किंवा पुसून घ्या. दिवाळीच्या दिवशी, जर तुम्ही कोणत्याही कारणामुळे संपूर्ण घर स्वच्छ करु शकत नसाल, तर किमान उत्तर-पूर्व दिशा आणि विशेषतः तुमचे प्रार्थनास्थळ स्वच्छ करा.

2. तुमच्या घरात अधूनमधून वापरल्या जाणार्‍या किंवा फेकून न दिल्या जाणार्‍या जास्त वस्तू असतील तर त्या दक्षिण-पश्चिम दिशेला गोळा करा. अशा वस्तू कधीही उघड्यावर ठेवू नका.

3. दिवाळीच्या दिवशी घराबाहेर आम्रपल्लव लावा आणि पंचागुलक, स्वस्तिक, ॐ, एक ओंकार इत्यादी जुने चिन्ह पुसून नवीन बनवा.

4. जर तुमच्या मुख्य दरवाजावर कोणत्याही देवाची मूर्ती किंवा चित्र असेल तर ते स्वच्छ करा. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येणार नाही याची पूर्ण काळजी घ्या. दाराच्या सर्व बिजागरांमध्ये तेल घाला.

5. दिवाळीच्या दिवशी घराचे पूजेचे ठिकाण आणि देवाचे कपडे वगैरे स्वच्छ करा. शक्य असल्यास जुने कपडे काढून नवीन कपडे वापरा.

6. दिवाळीच्या रात्री कच्चा सूत घेऊन शुद्ध केशराने रंगवून ते आपल्या कामाच्या ठिकाणी ठेवल्याने प्रगती होते.

7. दिवाळीच्या दिवशी पूर्वजांच्या स्मरणार्थ 11 लोकांना अन्नदान केल्याने घरात सुख-शांती कायम राहते.

8. दिवाळीला श्री महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री सुक्तमचे 12 पाठ आणि लक्ष्मी मंत्राची एक जपमाळ ‘श्रीं ह्रीं क्लीं श्री लक्ष्मीरागच्छागच्छ मम मंदिरे तिष्ठ स्वाहा’ असा जप करा. यानंतर दररोज पूजेच्या वेळी या मंत्राचा जप करावा.

9. दिवाळीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करा. दिवाळीच्या रात्री पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये तेलाचा दिवा लावा आणि मग घरी परत या. हा उपाय करताना मागे वळून पाहू नका.

10. दिवाळीच्या दिवशी सकाळी उसाच्या मुळाला नमस्कार करुन घरी आणा. त्यानंतर रात्री लक्ष्मीपूजनासह त्याचीही पूजा करावी. यामुळे धन-संपत्ती वाढेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Deepawali 2021 : दिवाळीच्या रात्री संपत्तीच्या ठिकाणाशी संबंधित हे उपाय केल्यास व्हाल श्रीमंत

PHOTO | Dhanteras 2021 : धनत्रयोदशीच्या दिवशी या 5 गोष्टी खरेदी करणे आहे खूप शुभ

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें