मौनी अमावस्येला अवश्य करा हे उपाय, कालसर्प दोषापासून मिळेल कायमची मुक्ती
कालसर्प दोष असल्यास माणसाला आयुष्यभर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ज्योतिष शास्त्रामध्ये कालसर्प दोष अत्यंत अशुभ मानला जातो. परंतु आगामी मौनी अमावस्येला काही उपाय केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते. जाणून घेऊ कोणते आहे ते उपाय.

ज्योतिष शास्त्रात कालसर्प दोष अत्यंत अशुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असतो त्याच्या जीवनात अडचणी आणि संकट येतात. कालसर्प दोष माणसाला कोणत्याही कामात यशस्वी होऊ देत नाही. कालसर्प दोष माणसाच्या जीवनातून सुख संपत्ती आणि शांती हिरावून घेतो.
मौनी अमावस्या महत्त्वाची
अशी मान्यता आहे की मौनी अमावस्येला काही उपाय केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते. खरंतर हिंदू धर्म ग्रंथांमध्ये मौनी अमावस्या अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी स्नान करणे आणि दान करणे अत्यंत लाभदायी मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मौनी अमावस्येला काही उपाय सांगण्यात आले आहेत. जे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते. जाणून घेऊ काय आहेत ते उपाय.
कधी आहे मौनी अमावस्या?
यावर्षी मौनी अमावस्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7:35 मिनिटांनी सुरू होत आहे. 29 जानेवारीला संध्याकाळी 6: 05 मिनिटांनी संपेल. त्यामुळे 29 जानेवारीला मौनी अमावस्या साजरी केली जाणार आहे. त्याच दिवशी महाकुंभात दुसरे शाही स्नान होणार आहे.




कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मौनी अमावस्येला करा हे उपाय
नाग आणि नागिनीचे पूजन
मौनी अमावस्येच्या दिवशी चांदीच्या नागाची आणि नागिनीची पूजा करावी. पूजेनंतर नाग आणि नागिनीचे पवित्र नदीत विसर्जन करावे. या दिवशी चांदीच्या नागाची आणि नागिनीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. मान्यतेनुसार असे केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष दूर होऊ शकतो.
महादेवाची पूजा
मौनी अमावस्येला पवित्र नदी स्नान करणे आणि दान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते. कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी महादेवाची पूजा करावी. शिवतांडव स्तोत्राचे पठण योग्यरीत्या करावे. असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.
तुळशीची पूजा
हिंदू धर्मात तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला तुळशीची पूजा करणे कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
महामृत्युंजय मंत्राचा जप
महादेवाचा महामृत्युंजयाचा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो. मौनी अमावस्येला महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या मंत्राने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)